चिठ्ठी किंवा पूर्वपरवानगीविना आत या, पालिका अधिकाऱ्याच्या दालनाबाहेरील फलकाची चर्चा

Anna Bodade : प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर असे फलक लागतील तेव्हा आपला देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाल्याचा आपणास अभिमान वाटेल.
Anna Bodade
Anna BodadeSarkarnama

पिंपरीः लालफितीच्या कारभाराबाबत `सरकारी काम आणि चार दिवस थांब`ही म्हण प्रचलित आहे. कारण त्यासाठी सबंधित अधिकारी,तर सहजासहजी भेटायला हवा.पूर्वपरवानगी घेऊन वा चिठ्ठी देऊनही कधी कधी हे अधिकारी भेटत नसल्याने काम प्रलंबित राहते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका अधिकाऱ्याला (सहाय्यक आयुक्त) भेटण्यासाठी ना पूर्वपरवानगी लागते, ना चिठ्ठी. त्यांच्या दालनात अभ्यांगतांना थेट प्रवेश असल्याने त्यांचा वेळ वाचून त्यांना तिष्ठत रहावे लागत नाही.एवढेच नाही, तर भेट होत असल्याने कामेही त्यांची लगेच मार्गी लागत आहेत.

Anna Bodade
'राज्याचे आरोग्य अडाण्यांच्या हातात' : तानाजी सावंतांवर जगतापांची बोचरी टीका

महापालिकेच्या `क` क्षेत्रीय कार्यालयात हा सुखद अनुभव अभ्यांगतांना गेले दोन महिने येत आहे. या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त (उपजिल्हाधिकारी आणि क वर्ग महापालिकेतील उपायुक्त समकक्ष पद) अण्णा बोदडे यांनी शहरात प्रथमच ही अभिनव संकल्पना राबविली आहे.त्यामुळे त्याची चर्चा सुरु असून त्याबद्दल त्यांचे कौतूकही होत आहे.`` हे कार्यालय आपले असून मी व माझे अधिनस्त अधिकारी ,कर्मचारी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. माझ्या दालनामध्ये प्रवेश करण्यासाठी आपणास कोणत्याही पूर्वपरवानगीची अथवा चिठ्ठी देण्याची गरज नाही``,असे बोदडे यांच्या केबिन बाहेरील फलकावर नमूद करण्यात आले आहे. त्यांनी पालिकेच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख म्हणून याअगोदर काम केलेले असल्याने त्यांना जनतेची नाडी,त्यांच्या अडीअडचणी चांगल्या माहिती आहे. भेटायला आलेल्यांना थांबावे लागू नये, त्यांची कामे वेळेतच व्हावी आणि साहेबांकडून काम करून देतो असे सांगून गैरप्रकार होऊ नयेत म्हणून हा फलक लावल्याचे बोदडे यांनी आज सरकारनामाला सांगितले.थेट भेट होत असल्याने कामे वेळेत मार्गी लागत आहेत, असेही ते म्हणाले.

Anna Bodade
Maha vikas aaghadi : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता : कॉंग्रेस काय करणार ?

वरिष्ठ शासकीय अधिकारी त्यातही आयएएस,आयपीएस हे पूर्वपरवानगी (अपॉंईटमेंट)वा चिठ्ठी दिल्याशिवाय भेटत नाहीत. त्याला काहीसा पहिला छेद शहरात आयपीएस आणि शहराचे २० एप्रिल रोजी बदली झालेले पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिला होता.त्यांनी असा फलक लावला नव्हता.पण, दिलेल्या वेळेत ते सर्वांनाच सहजासहजी भेटत होते. त्यांना भेटल्यांनंतर कामे मार्गीही लागत होती. त्यामुळे आतापर्यंतच्या पोलिस आयुक्तांत त्यांच्याकडेच भेटीसाठी खूप मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. बोदडे यांनी,तर भेटण्यासाठी कुठलीही पूर्वपरवानगी वा चिठ्ठीची गरजच नसल्याचा बोर्ड लावल्याने त्यांच्याकडेही गर्दी होत आहे.त्याबद्दल आरटीआय कार्यकर्ते आणि जागृत नागरिक महासंघाचे (माहिती अधिकार समिती) अध्यक्ष नितीन यादव यांनी बोदडे यांना पत्र लिहून त्यांचे खास कौतूक केले आहे.प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर वरिष्ठ अधिकारी असे फलक लावतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाल्याचा आपणास अभिमान वाटेल,असे या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com