किरण गोसावीचा आणखी एक प्रताप ; भोसरीतील तरुणाला नोकरीसाठी गंडा

आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवून किरण गोसावीने (Kiran Gosavi) भोसरीतील (Pimpri Chinchwad) एका तरुणाला सव्वादोन लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण आता समोर आले आहे.
kiran gosavi
kiran gosavisarkarnama
Published on
Updated on

पिंपरीःमुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणानंतर किरण प्रकाश तथा के. पी. गोसावी (वय ३६, रा. ठाणे) हा सध्या पुणे लष्कर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने या ड्रग प्रकरणात सुपरस्टार शाहरूख खान याच्याकडून १८ कोटी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा डाव त्याच्या एका सेल्फीमुळे फसला. त्यानंतर अशाप्रकारे मुंबई,ठाणे,पुणे येथे फसवणुकीचे गुन्हे त्याने केल्याचे समजले.

आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवून किरण गोसावीने (Kiran Gosavi) भोसरीतील (Pimpri Chinchwad) एका तरुणाला सव्वादोन लाख रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी (ता.११) दाखल करण्यात आला.

केपी गोसावी आता पिंपरी-चिंचवडचे दबंग पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश तथा केपी यांच्या कचाट्यात आला आहे. त्यामुळे त्याची आता खैर नाही,असे बोलले जात आहे. सध्या केपी अशाच एका गुन्ह्यात पुणे (लष्कर) पोलिसांच्या ताब्यात आहे. भोसरीतील गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळताच त्याचा ताबा पुणे पोलिसांकडून घेतला जाईल,असे भोसरी पोलिस ठाण्यातील त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्याचे तपासाधिकारी महाजन यांनी आज (ता. १२) 'सरकारनामा'ला सांगितले.

त्याने नोकरीच्या शोधात असलेल्या भोसरीतील विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय ३३,रा. भोसरी,मूळ रा. लातूर) याच्याकडून वेळोवेळी सव्वादोन लाख रुपये नोकरीसाठी घेतले पण नोकरी लावली नाही. आखातात ब्रुनेई येथे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरीचे आश्वासन त्याने दिले होते. २०१५ मध्ये म्हणजे सहा वर्षापूर्वीची ही घटना आहे. त्यासाठी गोसावी हा पिंपरी-चिंचवडला आला. कानडे याच्याकडून त्याने तीस हजार रुपयांचा पहिला हफ्ता नाशिक फाटा येथे नोकरी लावून देण्यासाठी घेतला. मात्र, नोकरी तर नाही त्याने घेतलेले पैसे तरी द्यावेत म्हणून कानडे यांनी गोसावीमागे तगादा लावला होता. मात्र, सहा वर्षानंतरही त्याने ते दिले नाही. दरम्यान, त्याचे नाव ड्रग प्रकरणात नुकतेच समोर आले. तसेच त्याला पुणे पोलिसांनी अटक केल्याचे समजताच अखेरीस कानडेंनीही पोलिसांत धाव घेतली.

kiran gosavi
मुख्यमंत्री रुग्णालयातून परतल्यानंतर 'त्या' २५ अधिकाऱ्यांबाबत निर्णय

नोकरीच्या शोधात असलेल्या कानडेने २०१५ ला नोकरीच्या अनेक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून ठेवले होते. त्यावरून त्याला २१ मार्च २०१५ ला गोसावीच्या शिवा इंटरनॅशनल या रिक्रूटमेंट सेंटरकडून मेल आला. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये परदेशात ब्रुनेई येथे नोकरी आहे, असे त्याला सांगण्यात आले. त्यासाठी त्याला बायोडाटा पाठविण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार त्याने तो मेल केला. नंतर नोकरीसाठी गोसावीने कानडेकडून नाशिकफाटा येथे प्रथम तीस हजार रुपये रोख घेतले. नंतर त्याला लेकसिटी मॉल, माजीवडा, घोडबंदर रोड, ठाणे येथील आपल्या कार्यालयात बोलावले. तेथे ५ एप्रिलला त्याच्याकडून आणखी चाळीस हजार रुपये रोखच घेण्यात आले. नंतर आयसीआयसीआयच्या बॅंक खात्यावर वीस हजार रुपये भरण्यास सांगितले. मेडिकल करण्यासाठी दहा हजार रुपये घेतले गेले. अशाप्रकारे वेळोवेळी कानडेकडून गोसावीने सव्वादोन लाख रुपये उकळले. मात्र, नोकरी काही लावलीच नाही.तसेच सहा वर्षात पैसेही दिले नाही. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कानडेने काल पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com