
पिंपरीः पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे सांगत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी पालिकेतील आपल्या पक्षाच्या कारभाराचे गुरुवारी येथे समर्थन केले.
याव्दारे त्यांनी हे आरोप केलेल्या शिवसेनेच्या दोन खासदारांच्या आरोपातील हवाच काढून घेतली. एवढेच नाही,तर पुरावे द्या, तर कारवाई करतो, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
मेट्रोच्या पिंपरी-स्वारगेट मार्गावरील संत तुकारामनगर (पिंपरी) या पहिल्या स्थानकाचे भूमीपूजन बापट यांच्या हस्ते गुरुवारी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते."पीएमपीएमएल'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याविषयीच्या तक्रारीसंदर्भात पिंपरीच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे ते म्हणाले.
पालिकेच्या सव्वाचारशे कोटी रुपयांच्या कामात नव्वद कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नुकतेच शहराचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी नुकताच केला होता. त
सेच वारकऱ्यांच्या ताडपत्री खरेदीसह इतरही बाबींत गैरप्रकार झाल्याने शिवसेनेचे मारुती भापकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केलेल्या आहेत. त्यांनी नुकतेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही याप्रकरणी निवेदन दिले होते.
त्यासंदर्भात बापट म्हणाले,"सत्ता गेल्याने आलेल्या नैराश्यातून विरोधक आरोप करीत आहेत. आपण सत्ताधारी आहोत,या मानसिकतेतून ते अद्याप बाहेरच आलेले नाही. त्यांना राजकारण करायचे आहे. आम्हाला विकास करायचा आहे. जनतेने त्यांना थारा दिला नाही. आम्हीही तो देणार नाही''.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.