अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं पहायचंय!

भाजप नेत्यांची राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी खिल्ली उडवली.
MP Amol Kolhe
MP Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राज्याच्या सत्तेतील तीन राजकीय पक्षांत दररोज विसंवादाची लढाई सुरु असून त्यातील दोन पक्षांनी पुन्हा निवडणूक होईल, असे संकेत दिले आहेत, अशी भविष्यवाणी भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी (ता. १ ऑक्टोबर) कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथे केली होती. त्यांच्यासह असा दावा वारंवार करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर भाजप नेत्यांची राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी नाव न घेता खिल्ली उडवली. राज्यातील भाजप असं म्हणतं, तेव्हा मला माझ्या लहानपणाची ‘लांडगा आला रे, लांडगा आला,’ ही गोष्ट आठवते. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता लवकरच जाणार आणि पुन्हा निवडणूक होणार, असा दावा करणारे ते मोठे नेते आहेत, अशी कोपरखळीसुद्धा त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मारली. (I want to see Ajit Pawar become Chief Minister : MP Amol Kolhe)

दरम्यान, दादांकडून (अजित पवार) अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांना मुख्यमंत्री झालेले मला पहायचंय, त्यासाठी माझ्यासह प्रत्येक कार्यकत्याने त्यांना बळ दिले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली. अजितदादांनी पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवले. तेथे पक्षातील अनेकांना त्यांनी अनेक संधी दिल्या. आता, मात्र दादांना काही देण्याची वेळ आलीय. या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा या नेतृत्वाला बळ देण्याची वेळ आलीय. त्या भावनेतून आगामी पिंपरी पालिका निवडणुकीकडे पहावे, असे सल्लावजा आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते चऱ्होलीत बोलत होते. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, मंगला कदम आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

MP Amol Kolhe
आता लवकरच रिचार्ज होतोय...मतदारसंघात भेटीला येतोय!

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय, ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी पाहायचं असेल तर त्यांना पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती काय असते. हे आपण साहेबांना दाखवून दिले पाहिजे. हेच अजितदादांबाबत आहे. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजितदादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची हीच वेळ आहे. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे.

MP Amol Kolhe
थोपटे, मोरे, बाणखेले, आढळरावांनंतर खासदार कोल्हेंनीही घेतला त्या हातगाडीवर चहाचा आस्वाद!

शिरुर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारत उद्‌घाटन कार्यक्रमाला मी अजितदादांसोबत होतो. त्यावेळी ते त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा पाहत होते. मी त्यांना न्याहाळत होतो. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीनं अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजितदादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com