'खेड सेझ' 2013 मध्ये  आघाडी सरकारनेच रद्द केला  :आढळराव

पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथीलस्पेशल इकॉनॉमिक झोन'सेझ' रद्द केल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा ही ब्लंडर (घोडचूक) आहे.-शिवाजीराव आढळऱाव-पाटील
Adhalrao-Cm
Adhalrao-Cm
Published on
Updated on

पिंपरीः " पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथील स्पेशल इकॉनॉमिक झोन 'सेझ' रद्द केल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा ही ब्लंडर (घोडचूक) आहे,"असे  शिरूरचे  शिवसेना खासदार शिवाजीराव आढळऱाव-पाटील यांनी आज  सांगितले. 

"हा सेझ पावणेपाच वर्षापूर्वीच आघाडी सरकारने रद्द केला असून तो रद्द करण्याचा अधिकार नसलेल्या मुख्यमत्र्यांनी तो रद्द केल्याचे सांगणे हा मोठा विनोद आहे, "असे आढळराव म्हणाले.

या सेझसाठी निमगाव,कनेरसर,दावडी आणि केंदूर या गावातील  साडेबाराशे हेक्टर जमिन 2007 ला अधिग्रहित करण्यात आली होती.त्यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊन त्यांच्यावर अन्याय झाल्याने तो दूर करण्यासाठी हा सेझ रद्द करण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी काल केला होता. तसेच त्याबद्दल शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांच्याकडून त्यांनी मुंबईत सत्कारही घेतला होता. 

मुख्यमंत्र्यांचा वरील दावा हा शुद्ध बनाव असल्याचा आरोप   आढळराव यांनी केला . ते म्हणाले, " 2012 मध्ये केंद्रात आघाडी सरकार असताना पी. चिदंबरम अर्थमंत्री होते.त्यांनी कर सवलती कमी केल्याने देशभर स्थापन झालेले हे सेझ (स्पेशल एक्स्पोर्ट झोन) चालले नाहीत ."

" दरम्यान, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवे औद्योगिक धोरण 2012 ला आणले. त्यात सवलती देण्यात आल्या होत्या. त्याअंतर्गत इंडस्ट्रीयल टाऊनशिपला परवानगी दिली जाणार होती. त्यामुळे खेड सेझचे मालक असलेले उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या केईआयपीएलने (खेड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.) या कंपनीने आपला सेझ रद्द करण्याची मागणी केली.ती सेझ बोर्डाच्या 30 ऑगस्ट 2013 ला झालेल्या 59 व्या बैठकीत मंजूर करण्यात आली.एस.आर.राव हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com