Shankar Jagtap : मोदी सरकार पुरवणार आयटी क्षेत्राला भरपूर सुविधा : शंकर जगताप

हिंजवडी आयटी पार्कमध्ये नव्या कंपन्या येतात आणि हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतात. त्यामुळे आयटीला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली पाहिजे.
Shankar Jagtap
Shankar JagtapSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमध्ये नव्या कंपन्या येतात आणि हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतात. त्यामुळे आयटीला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यातून या क्षेत्रातील कंपन्या व आयटीअन्सना प्रचंड सुविधा पुरविण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे.

आयटी पार्क नव्याने उसळी घेईल यासाठी कंपन्यांचे व्यवस्थापन व आयटीयन्स सुरक्षिततेची हमी घेतली जाईल,’’ असे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सांगितले.

हिंजवडी आयटी पार्क देशात नावाजलेले आहे. महायुती शासनाचे उद्योगांना प्रोत्साहन देण्याबाबत नेहमीच आघाडीवर आहे व भविष्यात राहील. महायुतीच्या सरकारने मागील अडीच वर्षात आयटी पार्कच्या समस्या सोडवण्यासाठी हाती घेतलेले प्रकल्प येणाऱ्या काळात मार्गी लागणार आहेत.

हिंजवडी आयटी पार्कसंदर्भात सुरू असलेल्या अपप्रचारावर महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘नदी सुधार योजना अंतर्गत जलवाहतूक सुरू होईल. त्यामुळे वाहतूक प्रश्न मार्गी लागेल.

उद्योग खात्यामार्फत सर्व कंपन्यांच्या व्यवस्थापनांशी चर्चा करून त्यांच्या अन्य समस्या देखील सोडवल्या जातील. हिंजवडी आयटी पार्कमधील सर्वात मोठी वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाला संमती दिली आहे.

त्याचे कामही सुरू आहे. पुढील काही महिन्यात मेट्रो सुरू झाल्यानंतर पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांची सोय होईल. वाहतूक सुरळीत होईल. रिंगरोड व अंतर्गत रस्त्यांमुळे वाहतूक समस्येचा प्रश्न पूर्णतः सुटेल. नदी सुधार योजनेअंतर्गत जलवाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

आयटीमधील सर्वात मोठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक हिंजवडीमध्ये केली आहे. त्यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे. आयटीअन्स सूज्ञ आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेल्या भूलथापा आणि अपप्रचाराला बळी न पडता हा संपूर्ण वर्ग महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com