PCMC News : उद्योगनगरीत कामगारांचा आक्रोश : थेट आमदारांनाच इशारा!

PCMC News : कष्टकऱ्यांवर अन्याय कराल तर येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू
PCMC News
PCMC NewsSarkarnama

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत सोळाशे सफाई महिला कामगारांसह ९ हजारापेक्षा अधिक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशव्दारावर कष्टकरी कामगार पंचायतने थाळीनाद आंदोलन केले.

आता महापालिकेची निवडणूक पुढील काळात होऊ घातली आहे. तरीही शहरातील लोकप्रतिनिधींनी सफाई कामगार प्रश्नावर बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले. कंत्राटी कामगारांचे प्रश्न येत्या आठ दिवसांत सोडवले नाहीत, तर शहरातील आमदार, खासदारांच्या घरावर मोर्चा काढू, तसेच येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.

PCMC News
Parbhani : प्रशासकाची नेमणूक टाळणाऱ्या उपनिबंधकास राष्ट्रवादीच्या आमदाराचा झटका..

कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम सेवेत घ्यावे, ठेकेदाराकडून होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी कडक उपयोजना कराव्यात, कामावरून काढण्यात आलेल्या सर्व कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे. दिवाळी बोनस द्यावा, पीएफ आणि ईएसआयचा लाभ मिळावा. पगाराची स्लिप द्यावी, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. यावेळी घरकाम महिला सभेच्या अध्यक्षा आशा कांबळे, कष्टकरी कामगार पंचायतच्या सरचिटणीस मधुरा डांगे, उपाध्यक्ष अनिल गाडे हे ही उपस्थित होते.

PCMC News
Amol Mitkari : महाजनांकडून मिटकरींचा करेक्ट कार्यक्रम, गावातच बसला धक्का!

दरम्यान, कामगार कपात करणार नसल्याचे व काढलेल्या कामगारांना ताबडतोब कामावर घेण्याचे आश्वासन आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र,येत्या आठ दिवसात या कामगारांवरील अन्याय न थांबल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा कांबळे यांनी यावेळी दिला. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांना दिवाळी बोनसपासून वंचित ठेवले,ही श्रीमंत पालिकेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे,असे ते म्हणाले.

बोनस देणे तर दूरच. उलट हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या या कामगारांना धमक्या देणे, त्यांचा छळ करणे, अधिकचे काम सांगून मानसिक छळ करणे,कामावरून कमी करणे असे उद्योग ठेकेदार करीत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.दुसऱ्या बाजूला पालिका आयुक्त व प्रशासन यांची जबाबदारी असतानाही ते या प्रश्नाकडे कानाडोळा करत आहेत, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com