पिंपरीत भाजपला पहिला झटका, नाराज नगरसेवकाने आरोप करीत दिला राजीनामा

मोशी-जाधववाडी भागाच्या विकासासाठी, जनतेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. माझी पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे बोराटे यांनी सांगितले.
Vasant Borate
Vasant Boratesarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची (Pimpri Municipal Corporation)सार्वत्रिक निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर होणारी पडझडही शहरात सुरु झाली आहे.

२०१७ ला प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या व पुन्हा सत्तेत येणार असल्याच्या दावा केलेल्या भाजपचे (bjp)नगरसेवक वसंत बोराटे (Vasant Borate)(प्रभाग क्र. २)यांनी बुधवारी (ता. १६) आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. विद्यमान नगरसेवकाचा हा पहिला राजीनामा आहे. तसेच तो भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघातील आहे, हे विशेष.

पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता. शेवटपर्यंत सन्मान दिला नाही. सन्मानाने वागविले नाही. अशीच मानसिकता आणि खदखद अनेक नगरसेवकांच्या मनात आहे. परंतु, ते स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाहीत. मोशी-जाधववाडी भागाच्या विकासासाठी, जनतेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. माझी पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे बोराटे यांनी सांगितले.

बोराटेनंतर शहराचे दुसरे कारभारी, माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार यांच्या मतदारसंघातील गेल्या पाच वर्षात एकही पद न मिळालेले तसेच पालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्धच पालिका सभेतच नाही,तर सभागृहाबाहेरही मोठा आवाज उठविलेले असे भाजपचे दोन नाराज नगरसेवक सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तशीही १३ मार्चला पालिकेची मुदत संपत असल्याने आतापर्यंत अडलेले हे राजीनामासत्र सुरु होणार असल्याचे संकेत बोराटेंनी दिले आहेत.

आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राहूल जाधव यांचा व बोराटे यांचा एकच प्रभाग (मोशी- जाधववाडी) मोशीआहे. त्याच्या विकासासाठी राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे त्यांनी तो सुपूर्त केला. त्यामुळे येत्या शुक्रवारी होणाऱ्या पालिका सभेला ते उपस्थित असणार नाहीत. मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. ते झाले नाहीत. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी पदाचा राजीनामा दिला असल्याचे बोराटे यांनी सांगितले.

Vasant Borate
राऊतांच्या पत्रकार परिषदेवर पटोले म्हणाले, 'आरोपांचे समर्थन, पण..'

मोशीत ग्रीन झोन आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे रहिवाशी झोनमध्ये रूपांतर करण्याची पाच वर्षात वारंवार मागणी केली. पण, त्याला कोणी दाद दिली नाही. विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे, अशी उद्विग्नता त्यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केली. विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले नाही.

''जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. तेही झाले नाही. नदी सुधार प्रकल्पात नदीच्या बाजूचा परिसर विकसित होऊ शकला नाही परिणामी विकास कामांना गती मिळाली नाही. जनतेच्या दृष्टीने अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत . मोशी, जाधववाडी भागातील लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. त्याप्रमाणात या भागातील नागरिकांना न्याय मिळाला नाही,'' अशी खंत बोराटेंनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com