साताऱ्यातील कामगिरीबद्दल पुण्यातील अभियंत्याचा पिंपरी पालिकेकडून सत्कार!

४० किलोमीटर रस्त्याचे तीन वर्षे रखडलेले डांबरीकरण एका दिवसात करण्याचा केला विक्रम
Pcme Mayor
Pcme MayorSarkarnama

पिंपरी : सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यानच्या ४० किलोमीटर रस्त्याचे तीन वर्षे रखडलेले डांबरीकरण एका दिवसात करण्याचा विक्रम पुण्यातील रस्ते कंपनीने नुकताच केला. त्यात सिंहाचा वाटा असलेल्या या कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आणि अभियंते सोमनाथ रुपनवर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सोमवारी (ता.२० सप्टेंबर) महासभेत महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रुपनवर हे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि ड प्रभाग अध्यक्ष सांगर अंघोळकर यांच्या  प्रभागात पिंपळे गुरव येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा पालिकेने हा खास सन्मान केला आहे.

डांबरीकरणाच्या अत्याधुनिक पेव्हर पद्धतीमुळे हे शक्य झाले, असे अभियंता रुपनवर यांनी सरकारनामाला सांगितले. ते पुण्यातील राजपथ इन्फ्रा. प्रा. लि. कंपनीत काम करीत आहेत. त्यांनीच याबाबत माहिती दिली. अडीचशे वाहने, पावणेतीनशे कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. डांबरीकरणासाठी रस्त्याचे भाग करण्यात आले होते. प्रत्येक भागासाठी एक प्रोजेक्ट मॅनेजर आणि अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Pcme Mayor
दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराने पिंपरी-चिंचवड हादरले

सर्वांनी एकजूटीने काम करुन हा विक्रम केला. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेणार आहे. कंपनीला या रस्त्याचे ४६ किलोमीटरच्या डांबरीकरणाचे कंत्राट २०१८ ला मिळाले होते. ते दोन वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र, ते सुरु होतेय न होते तोच आलेल्या कोरोनामुळे त्याला ब्रेक लागला होता. ही साथ काहीशी कमी होताच परवानगी मिळाली. मनुष्यबळ उपलब्ध झाले. त्यामुळे ३१ मे च्या सकाळी आठ वाजता या विक्रमास सुरवात झाली. दुसऱ्या दिवशी आठपूर्वी काम पूर्ण करण्यात आले, असे ते म्हणाले.

Pcme Mayor
अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे?

या कामगिरीसाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि कामासाठी लागणारे साहित्याचे सूक्ष्म नियोजन करणारे रुपनवर यांचा महापौरांच्या हस्ते शाल, पुस्तक आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अंगोळकर उपस्थित होते. तर, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप आदींनी ऑनलाईन हजेरी लावली.

यावेळी हा विश्वविक्रम असल्याचा दावा महापौरांनी केला. त्यांच्या या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांचा शहराला सार्थ अभिमान वाटत आहे, असेही त्या म्हणाल्या. याबरोबरच रुपनवरांचे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानेही या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com