स्मार्ट सिटी कंपनी म्हणायचं की स्मार्ट भाजप कंपनी ?

स्मार्ट सिटीच्या कारभारातील भाजपचा हस्तक्षेप उघड झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिकाSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पदावर सत्तारुढ पक्षनेते भाजपचे नामदेव ढाके यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाची नियुक्ती झाली. त्यावरून विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि ढाकेंवर आज ( ता.२२सप्टेंबर ) हल्लाबोल केला. गोपनियता, विश्वासार्हता धोक्यात आणणारी ही गंभीर बाब असून त्यातून स्मार्ट सिटीच्या कारभारातील भाजपचा हस्तक्षेप उघड झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका
दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराने पिंपरी-चिंचवड हादरले

स्मार्ट सिटीच्या कारभारात अशाप्रकारे सत्ताधारी भाजप पदाधिका-यांशी संबधित व्यक्ती महत्त्वाच्या पदावर काम करणे, तर ही बाब गंभीर आहे, असे वाघेरे म्हणाले. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनी म्हणावे की "पिंपरी चिंचवड स्मार्ट भाजप कंपनी", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी प्रशासन चालवत आहे की भाजप ? हा प्रश्न निर्माण होत आहे असेही ते म्हणाले.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप हे प्रशासनाला हाताशी धरून भोंगळ कारभार करीत आहे. त्याची असंख्य उदाहरणे उघड होत असताना हे नवे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ राजेश पाटील यांनी ही नियुक्ती तातडीने रद्द करावी अशी मागणी वाघेरे यांनी आज केली.‌ अन्यथा, स्मार्ट सिटीत होणा-या हस्तक्षेपाला प्रशासक म्हणून आयुक्त आणि संपूर्ण यंत्रणादेखील जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिका
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूरमध्ये दोन सदस्यीय प्रभागरचना राहणार..

भाजपने गेल्या साडेचार वर्षात शहराची दुर्दशा करून ठेवली आहे. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, भाजप नेत्यांचे सबंध उघड झाले. आता स्मार्ट सिटीमध्ये वशिलेबाजी करून आपल्या बगलबच्च्यांची वर्णी लावणे त्यांनी सुरू केले आहे. ढाके सध्या स्मार्ट सिटी कंपनीचे संचालकही आहेत. त्यांच्या पीएच्या स्मार्ट सिटीच्या पीआरओपदी नियुक्तीतून  स्मार्ट सिटीच्या कारभारातील भाजपचा हस्तक्षेप आणि वशिलेबाजी उघड झाली आहे. या प्रक्रियेत अनुभवी व पात्र उमेदवारांना डावलण्यात आले आहे. त्यात काही अधिका-यांकडूनही हस्तक्षेप झाला आहे. या पध्दतीने कारभार होणार असेल, तर कंपनीचे नाव बदलून ते स्मार्ट भाजप कंपनी असे करण्याची आमची मागणी आहे, असे वाघेरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com