Chinchwad : राहुल कलाटेंनी डावलला उद्धव ठाकरेंचा आदेश; चिंचवडमधून तिरंगी लढत

Rahul Kalate : अश्विनी जगताप विरुद्ध नाना काटे विरुद्ध राहुल कलाटे
Rahul Kalate, Ashwini Jagtap, Nana Kate
Rahul Kalate, Ashwini Jagtap, Nana KateSatrkarnama

By Poll Election : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली. येथे भाजपकडून दिवगंत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रबळ दावेदार असलेले राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे चिंचवडमधून तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील सर्व उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com