राजकीय क्षेत्रातही मोठा गोंधळ किंवा नाट्यमय घटना घडण्याची शक्यता या आठवड्यात आहे. केंद्रामध्ये, तसेच उत्तर भारतातील काही राज्यांत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील. अधिवेशनात सभागृहामध्ये मोठ्या गोंधळातून कामकाज ठप्प होण्याची शक्यता राहील. सरकार व मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतील, असे भाकीत ज्योतीष सिद्धेश्वर मारटकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले.
दि. ५ नोव्हेंबरच्या पौर्णिमान्त कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून, व्ययस्थानात मेष राशीत भरणी नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. लग्नस्थानी हर्षल, तृतीयेत गुरू, चतुर्थात केतू, दशमात राहू, षष्ठात रवी शुक्र, सप्तमात मंगळ, बुध, नवमात प्लुटो, लाभस्थानी शनी-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता केंद्रस्थानातील बुध-मंगळ युती-प्रतियोग हर्षल या योगामुळे नोव्हेंबरच्या पूर्वार्धात हवेत मोठी उष्णता वाढण्याची शक्यता राहील.
या योगामुळे मोठा भूकंप होण्याची शक्यता वाटते. दरड कोसळणे, भूस्खलन यांसारख्या घटनांमधून मोठी हानी संभवते. चतुर्थ दशमातील राहू-केतूमुळे हवेमध्ये विचित्र बदल होतील. केंद्रातील बुध, मंगळ हर्षल राहू-केतू या योगामुळे सर्व स्तरांवर अशांतता निर्माण होण्याची शक्यता वाटते.
नैसर्गिक आपत्ती, विमान, रेल्वे दुर्घटना, मोठे अपघात, युद्ध, दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना, आगीच्या दुर्घटना यांमधून मोठी हानी संभवते. फसवणूक किंवा अपहरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल. राजकीय क्षेत्रातही मोठा गोंधळ किंवा नाट्यमय घटना या काळात संभवतात. केंद्रामध्ये, तसेच उत्तर भारतातील काही राज्यांत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील. या योगामुळे अधिवेशनात सभागृहामध्ये मोठ्या गोंधळातून कामकाज ठप्प होण्याची शक्यता राहील. सरकार व मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतील.
सप्तमातील स्वराशीतील मंगळामुळे पोलिस/लष्कराला मोठे यश मिळेल. शत्रू राष्ट्रास जशास तसे उत्तर दिले जाईल. मोठे दहशतवादी-गुन्हेगार मारले जातील. या योगामुळे खेळ/स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. व्ययस्थानी पौर्णिमा येत असून, षष्टातील रवी-शुक्रामुळे शेअर मार्केटमध्ये मंदीचे वातावरण राहील. मोठे करेक्शन होण्याची शक्यता राहील.
सोन्या-चांदीच्या भावात घसरण होण्याची शक्यता राहील. षष्ठातील रवी-शुक्र सरकारी कर्मचारी व नोकरदार वर्गासाठी अनुकूल आहे. मोठ्या प्रमाणावर नवी नोकरभरती होईल.स्त्री वर्ग, कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. मोठे कलाकार किंवा चित्रपट वादविवादात अडकतील. यावरून निदर्शने होतील.
लाभस्थानातील शनी-नेपच्यून योगामुळे या काळात काही संसर्गजन्य विकार पसरले जातील. विमान/जहाज भरकटणे किंवा जहाज, विमान दुर्घटना या काळात संभवते. दक्षिणेकडील राज्यात मोठ्या पावसामुळे मोठी हानी होण्याची शक्यता राहील. तृतीयेतील गुरू-प्लुटो प्रतियोग लेखक, साहित्यिक, प्रसारमाध्यमांसाठी प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो. या योगामुळे मंदिरे, धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्र या ठिकाणी अपघात-घातपात होण्याची शक्यता राहील.
भूकंपाची शक्यता, हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ
भारतीय खेळाडूंना मोठे यश
पोलिस, लष्कराकडून दहशतवादी, गुन्हेगारांवर कारवाई
शेअर मार्केटमध्ये गोंधळ,
मोठी घसरण
राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.