Political Horoscope: राजकारणात नाट्यमय घडामोडी; इंडिया आघाडीमध्ये फूट पडेल

Dramatic Changes in Indian Politics INDIA Alliance Split: भविष्यनामा : ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५:सत्ताधारी पक्ष व नेत्यांवर मोठे आरोप होतील. मोठ्या नाट्यमय घटना या काळात अनुभवास येतील. सत्ताधारी आघाडीत मित्रपक्षांचे रुसवेफुगवे समोर येतील.
INDIA Alliance
INDIA AllianceSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण कुंभ राशीत होत आहे. दशमस्थानी चंद्र-राहू, चतुर्थात रवी-केतू, बुध, पंचमात मंगळ, लाभस्थानी शनी-नेपच्यून, धनस्थानी गुरू, तृतीय स्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती आहे. या ग्रहणाचा परिणाम देशातील राजकीय परिस्थितीवर होणार असून, देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ अनुभवास येईल. सत्ताधारी पक्ष व नेत्यांवर मोठे आरोप होतील. मोठ्या नाट्यमय घटना या काळात अनुभवास येतील. सत्ताधारी आघाडीत मित्रपक्षांचे रुसवेफुगवे समोर येतील.

दशमातील चंद्र-राहू युतीमुळे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय होईल. विरोधी पक्षांचे मते फुटण्याची शक्यता राहील. इंडिया आघाडीमध्ये फूट पडेल. यावरून विरोधी पक्षांची सत्ताधारी पक्षावर टीका होईल.

वृषभ लग्नातील हर्षल देशातील आर्थिक दर्शवितो. अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे वस्तूंच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार अनुभवास येतील. उंची वस्तू, फॅशनच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल यांच्या भावात घसरण होईल. शेअर बाजारामध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता वाटते. सोन्या-चांदीच्या भावात घसरण होईल. रवी-केतू युतीमुळे मोठ्या नेत्यांचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता राहील.

१५ सप्टेंबरपर्यंत मोठ्या पावसाचा आणि अतिवृष्टीचा धोका कायम राहील. देशातील प्रमुख शहरे, उत्तर भारतात ढगफुटी, भूस्खलन, दरड कोसळणे यांमधून हानी होईल. ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या काळामध्ये सूर्याचे पूर्वा नक्षत्रात भ्रमण असणार आहे. या नक्षत्रावर उष्णता वाढून साधारण वृष्टी संभवते. मात्र, उत्तर महाराष्ट्र व उत्तर भारतात दोन ते आठ सप्टेंबर या काळामध्ये मोठ्या पावसाची शक्यता राहील. पुढील काळात मंगळ तूळ राशीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे वादळे, भूकंप यांमधून हानी संभवते.

INDIA Alliance
Gadchiroli Steel City Plan: फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला भाजपच्याच आमदाराचा खोडा!

या काळात शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. चीनबरोबरच व्यापार वाढण्याची शक्यता असून, पाकिस्तानबरोबरच्या क्रिकेट सामन्यांना हिरवा कंदील मिळेल. मोठ्या स्त्री कलाकार किंवा सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या घटना या काळात संभवतात. पंचमातील मंगळामुळे लहान मुले, विद्यार्थी वर्गासाठी हा काळ प्रतिकूल राहील.

साप्ताहिक राशिभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५

मेष : सप्ताहाची सुरुवात दगदग करणारी राहील. मात्र, सप्ताहात गणेशोत्सव उत्साहाने साजरा कराल. सामाजिक क्षेत्रात आनंद मिळेल. संगीत, मनोरंजन या कार्यक्रमांत सहभागी व्हाल. घर, वाहन खरेदी होईल.

वृषभ : भावंडे, नातेवाइकांचा सहवास लाभेल. उत्तरार्धात अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक समस्या सुटतील. तीर्थयात्रा-धार्मिक विधी होतील. गणेशोत्सवाचा आनंद घ्याल. सुवार्ता कळतील.

मिथुन : नोकरीत चांगले बदल संभवतात. पगारवाढ, उत्पन्नात वाढ होईल. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. उत्तरार्धात तरुणांना जोडीदार मिळेल. कोर्टकचेरीमध्ये अनुकूल निर्णय होतील.

कर्क : शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होईल. मन आनंदी उत्साही राहील. तरुणांना नोकरीच्या नव्या संधी मिळतील. नोकरीत पदोन्नती मिळेल. परदेशगमनासाठी संधी मिळेल. वादविवाद-कोर्टकचेरीमध्ये सामंजस्य-सहमतीने वाद मिटतील.

सिंह : घरातील वातावरण प्रसन्न राहील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. गणेशोत्सवात आनंदी व उत्साही राहाल. उपासना, देवदर्शन यातून समाधान मिळेल. संतती सौख्य उत्तम राहील.

कन्या : छोटे प्रवास कराल. कला, संगीत, मनोरंजनाचा आस्वाद घ्याल. घरातील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होईल. मोठी सजावट होईल. मोठ्या व्यक्तींचे आदरातिथ्य कराल. मुलांकडून आनंद मिळेल.

तूळ : सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नोकरी-व्यवसायात चांगले बदल होतील. गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होईल.

वृश्चिक : कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तरार्धात पैशांची कामे होतील. एकत्र कुटुंबात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल. भावंडे-नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. छोटे प्रवास-तीर्थयात्रा होतील.

धनू : दूरचे प्रवास होतील. नोकरीच्या निमित्ताने मोठे प्रवास होतील. आरोग्यात उत्तम सुधारणा होईल. तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मकर : तरुणांना जोडीदार मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. उंची वस्तू, वस्त्र, अलंकारांची खरेदी होईल. उत्तरार्धात मोठे प्रवास होतील. तीर्थयात्रा, धार्मिक, मंगल कार्यासाठी खर्च होतील.

कुंभ : वरिष्ठांशी मतभेद संभवतात. नोकरीत बदलाचे प्रयत्न होतील. सामाजिक कार्यात कटकटी संभवतात. मात्र, उत्तरार्धात मित्रांचा सहवास लाभेल. जुनी येणी वसूल होतील. मोठी इच्छा पूर्ण होईल.

मीन : सांस्कृतिक-सामाजिक कार्यातून आनंद घ्याल. धार्मिक विधी, देवधर्म होतील. कलाकारांना प्रसिद्धी पुरस्कार मिळतील. नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी मिळेल. घर-वाहन खरेदीसाठी प्रयत्न होतील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com