Maharashtra Politics: मित्र पक्षांमध्ये मतभेद? सत्तापालट होण्याची शक्यता

Political Horoscope Maharashtra Politics:मोठ्या राजकीय व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. काही राजकीय व्यक्ती तुरुंगवास किंवा मृत्यू या काळात संभवतात. राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय व अनपेक्षित घटना या काळात होण्याची शक्यता असून मोठे पक्ष फुटतील.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

दि. २१ ऑक्टोबरच्या अमांत कुंडलीमध्ये मेष लग्न उदित असून, सप्तम स्थानी तूळ राशीत चित्रा नक्षत्रात अमावस्या येत आहे. सप्तमात रवी, चंद्र, मंगळ, बुध, चतुर्थात गुरू पंचमात केaतू, लाभात राहू, षष्ठात शुक्र व व्ययस्थानी शनी-नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे.

एकूण ग्रहस्थितीचा विचार करता सप्तमातील मंगळयुक्त अमावस्या मोठ्या युद्धासाठी परिणामकारक राहील. काही देशांत या काळात मोठे युद्ध भडकण्याची शक्यता राहील. शेजारील देशांकडून सीमेवर घुसखोरी किंवा मोठ्या कुरापती काढल्या जातील. पोलिस, लष्करासाठी हा काळ प्रतिकूल असून जवानांवर हल्ले होतील. रशिया युक्रेन, इस्राईल-इराण युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, युरोप खंडात अशांतता निर्माण होईल. या काळात मोठे हवाई हल्ले किंवा विमान दुर्घटना या काळात संभवते.

राजकीय क्षेत्रात मोठे बदल या काळात संभवतात. युती/आघाडीमध्ये मित्र पक्षांचे वादविवाद/मतभेद वाढतील. युती/आघाडीमध्ये फूट पडेल. मोठ्या पक्षात फूट पडण्याची शक्यता राहील. काही राज्यांत सत्तापालट होण्याची शक्यता राहील. मोठ्या राजकीय व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. काही राजकीय व्यक्ती तुरुंगवास किंवा मृत्यू या काळात संभवतात. राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय व अनपेक्षित घटना या काळात होण्याची शक्यता असून मोठे पक्ष फुटतील.

Maharashtra Politics
Local Body Election 2025: भाजपसमोर निवडणुका जिंकण्याचे आव्हान; अतिवृष्टीमुळे गणित बिघडणार?

या काळात मोठे शाब्दिक वाक्‌युद्ध रंगण्याची शक्यता राहील. वाद‌ग्रस्त वक्तव्यावरून आंदोलने होतील. या काळात मोठ्या खेळ/स्पर्धेचे आयोजन होईल. भारतीय खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत चांगले यश मिळेल.

चतुर्थातील गुरूमुळे मंदिरे/ऐतिहासिक वास्तूंचे पुनर्निर्माण होईल. राममंदिराचे काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असून, सोन्या-चांदीच्या भावात मोठी घट होईल. या काळात सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील. दसरा-दिवाळीच्या निमित्ताने बाजारात मोठा उत्साह दिसेल.

मोठ्या कलाकारांवर कायदेशीर कारवाया होतील. कलाकार किंवा चित्रपटावरून मोठे वाद होतील. शुक्र नीच राशीत षष्ठस्थानी शनी नेपच्यूनच्या प्रतियोगात असल्यामुळे स्त्रीवर्ग/कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. स्त्रियांवरील अत्याचाराच्या, विनयभंगाच्या घटना या काळात वाढतील. या काळात सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या काळात वादळे, अतिवृष्टी, पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठे नुकसान होण्याची शक्यता वाटते. भूस्खलन किंवा दरड कोसळणे, हिमस्खलन यांसारख्या घटना या काळात संभवतात. मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना या काळात होण्याची शक्यता राहील.

  • काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल.

  • अतिरेकी कारवाया/स्फोटक घटना.

  • युती/आघाडीमध्ये फूट, मोठा पक्ष फुटण्याची शक्यता

  • शेअर मार्केटमध्ये घसरण, सोने-चांदीच्या भावात घट

  • स्त्री/कलाकारांना प्रतिकूल काळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com