Political Horoscope: डोनाल्ड ट्रम्प यांचा कडक निर्णय, राजकीय व्यक्तींना तुरुंगवास, आयात-निर्यातीला मोठा फटका...

Weekly Rashi Bhavishya : धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती, मंदिरे, धार्मिक स्थळे यांच्यावर सरकारी निर्बंध येतील. वक्फ बोर्डसारख्या कायद्यांमध्ये मोठे बदल होतील. धार्मिक स्थळांवरील अपघात-चेंगराचेंगरीच्या घटना अनुभवास येतील.
Bhavishyanama 12.jpeg
Bhavishyanama 12.jpegSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

२९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीत प्रवेश करणार असून, पुढील अडीच वर्षे याच राशीतून शनीचा प्रवास असेल. विमानप्रवास, जहाज यांच्यासाठी प्रतिकूल काळ असेल. व्हिसा, पासपोर्ट यांचे नियम अधिक कडक होतील. परदेशातील प्रवासावर निर्बंध येतील आणि परदेशातील नोकऱ्यांमध्ये कपात होईल. आयात-निर्यातीवर निर्बंध येतील ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टेरिफमुळे अनेक देशांना आयात-निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सायबर क्राइम अधिक सक्षम होऊन या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल. तुरुंग-हॉस्पिटलमधील गैरप्रकार, भ्रष्टाचार यांच्यावर कारवाया होतील. या काळात मोठ्या (ज्येष्ठ) राजकीय व्यक्तींना तुरुंगवास किंवा मृत्यू यांसारख्या घटना वाढण्याची शक्यता राहील. पुढील काळात विमान/जहाज दुर्घटना वाढण्याची शक्यता असून, विमान व जहाज प्रवास भाडे मोठ्या प्रमाणावर वाढतील.

पुढील वर्षात पावसाचे प्रमाण कमी होऊन पाण्याचा तुटवडा जाणवेल, बँकाचे कर्ज धोरण बदलण्याची शक्यता असून, कर्जप्रक्रिया अधिक कडक होईल. कर्जामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत येतील. मात्र व्याज दरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटसाठी प्रतिकूल काळ असून, पुढील काळात मार्केटमध्ये दीर्घकाळ मंदी राहण्याची शक्यता आहे.

Bhavishyanama 12.jpeg
NCP Mlc Election : राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी 'या' तीन नेत्यांना दिला मोठा आदेश ; उद्या दुपारी होणार नावाची घोषणा

धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती, मंदिरे, धार्मिक स्थळे यांच्यावर सरकारी निर्बंध येतील. वक्फ बोर्डसारख्या कायद्यांमध्ये मोठे बदल होतील. धार्मिक स्थळांवरील अपघात-चेंगराचेंगरीच्या घटना अनुभवास येतील. काश्‍मीर प्रश्‍न पुन्हा पेटण्याची शक्यता असून सुरक्षा दलांवर हल्ले होतील. हिमालयातील कडे कोसळून होणारे अपघाताचे प्रमाण वाढेल.

पुढील काळातील मोठ्या युद्धाकडे जगाची वाटचाल सुरू असण्याची चिन्हे निर्माण करणारे राहील. तेल-लोखंड-खनिजे यांचा तुटवडा झाल्याने उद्योग-धंद्यांवर मोठा प्रतिकूल परिणाम होईल. विशेषतः युरोपीय देशांना शनीचे मीन राशीतील भ्रमण विशेष प्रतिकूल राहील. भारताची संरक्षणक्षमता अधिक सक्षम होईल. देशाची आर्थिक ताकद वाढेल. शत्रूवर विजय मिळेल. ब्रिटन, जपान, जर्मनी यांसारख्या देशांना मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. युक्रेन- इराणसाठी शनीचे भ्रमण लाभदायक राहील. मित्रदेशांची मदत मिळेल. युद्धविरामासाठी प्रयत्न होतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प प्रशासनाकडून कडक निर्णय घेतले जातील.

Bhavishyanama 12.jpeg
AAP News: 'दिल्ली' गमावलेल्या केजरीवालांचा आता 'महाराष्ट्र'वर फोकस; स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणुकीत ताकदीनं उतरणार

येथील उद्योगधंदे अडचणीत येण्याची शक्यता असून बेरोजगारी वाढल्यामुळे परदेशी नोकरदार वर्ग कमी होईल. चीनसाठी व्यापारवृद्धीसाठी अनुकूल काळ राहील. मात्र संसर्गजन्य विकार, विषाणूजन्य विकाराचा विळखा चीनसाठी त्रासदायक राहील. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान यांना त्सुनामी-पुराचा मोठा धोका राहील.

साप्ताहिक राशिभविष्य

१५ मार्च ते २१ मार्च

मेष : २९ मार्चपासून (शनीचे मीन राशीतील भ्रमण) साडेसाती सुरू होणार आहे. साडेसातीचे पहिले अडीच वर्ष गुंतवणूक वाढविणारे राहतील. कायदेशीर कामासाठी खर्च होतील. नोकरी-व्यवसायासाठी दूरचे प्रवास किंवा परदेशगमनाची संधी मिळेल.

वृषभ : पुढील अडीच वर्षात नोकरी-व्यवसायात अनुकूल बदल होतील. दीर्घकाळ अडकलेले पैसे-येणी वसूल होतील. शत्रूवर विजय मिळेल. दीर्घकाळची रेंगाळलेली कामे-इच्छा पूर्ण होतील. लाभातील रवीचे भ्रमण उत्पन्न वाढविणारे आहे.

मिथुन : नोकरी-व्यवसायातील कष्ट, जबाबदारी वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठे पदाची जबाबदारी मिळेल. दबदबा वाढेल. मात्र वरिष्ठांशी मतभेद वाढतील. घरातील-ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. नोकरीमध्ये बदल किंवा बदली होईल. व्यवसायात बदल संभवतात.

कर्क : पुढील अडीच वर्षातील शनीचे भाग्य स्थानातील भ्रमण मिश्र फळ देणारे राहील. वडिलोपार्जित कामातील अडथळे दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मात्र धार्मिक, मंगलकार्यात अडथळे येतील.

Bhavishyanama 12.jpeg
Harshvardhan Patil Politics: विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का देत पवारांसोबत गेलेले हर्षवर्धन पाटील पुन्हा नवा राजकीय डाव टाकणार..?

सिंह : पुढील अडीच वर्ष शनीचे भ्रमण आरोग्यासाठी त्रासदायक राहील. डोळे, पाय, पाठीचे दुखणे त्रासदायक होईल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून बचत कमी होईल. कर्जाच्या कामात विलंब होईल. कोर्ट-कचेरीचे निर्णय प्रतिकूल लागतील.

कन्या : पुढील अडीच वर्षात या काळात जोडीदाराशी दुरावा संभवतो. नोकरी व्यवसायानिमित्त दूर जावे लागेल. कोर्ट-कचेरी/ कायदेशीर कटकटींना तोंड द्यावे लागेल. भागीदारीतील व्यवसायात नुकसान संभवते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

तूळ : शत्रूवर विजय मिळेल. नोकरीमध्ये मोठे बदल होतील. मोठे प्रवास परदेशगमन होईल. कर्जाच्या कामात अडथळे येतील. दीर्घकाळ रेंगाळणारे दुखणे त्रासदायक राहील. वातविकार किंवा पाय व डोळ्यांचे दुखणे संभवतात. कर्जामुळे आर्थिक ओढाताण होईल.

वृश्चिक : पंचमातील शनीचे भ्रमण पुढील अडीच वर्ष संततीविषयी चिंता निर्माण करणारे राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणे कठीण राहील. शेअरमार्केटमध्ये मोठे नुकसान संभवते. दीर्घकाळ पैसे अडकतील. मात्र कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.

धनू : पुढील अडीच वर्ष मानसिक, शारीरिक कष्ट/ दगदग वाढविणारे राहतील. घरापासून दूर जावे लागेल किंवा बदली होईल. घर, जागेच्या कामात कटकटी संभवतात. घरातील व जवळच्या व्यक्तींची चिंता वाढेल. मानसिक स्थिती खराब राहील. घर, जागेच्या कामातून लाभ होतील.

मकर : मीन राशीतील शनीच्या प्रवेशामुळे साडेसातीतून सुटका होईल. आर्थिक समस्या सुटतील. मानसिक ताणतणाव कमी होईल. कौटुंबिक समस्यांवर मार्ग निघेल. पुढील अडीच वर्षात मोठी कामे होतील. कर्तृत्व सिद्ध होईल.

कुंभ : मीन राशीतील शनी प्रवेशाने साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून पुढील अडीच वर्षे साडेसाती राहणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल. एकटेपणा दूर होईल. मात्र आर्थिक चणचण भासेल. कौटुंबिक, आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. दीर्घकाळची गुंतवणूक होईल.

मीन : राशीतील शनी प्रवेशाने साडेसातीच्या मधली अडीच वर्षाचा टप्पा सुरू होणार आहे. आर्थिक समस्या कमी होतील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक, शारीरिक कष्ट वाढतील. एकटेपणा जाणवेल. सहमतीने वादविवाद मिटवावेत. विवाहसौख्यात असमाधान राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com