Political Horoscope: युद्धस्थिती भडकण्याचा धोका, मोठी न्यायालयीन प्रकरणे गाजतील

World War Fear Defence News: भविष्यनामा : ४ ते १० ऑक्टोबर २०२५:लग्नातील तूळ राशीतील मंगळामुळे काही देशांत युद्धासारखे प्रसंग निर्माण होतील. या योगामुळे वादळे, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती संभवते. या मंगळामुळे दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना, हिंसा, जाळपोळ, बंद, निदर्शने या कारणांमुळे अशांतता निर्माण होईल.
Bhavishyanama
Bhavishyanama Sarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

सात ऑक्टोबरच्या पौर्णिमान्त कुंडलीमध्ये तूळ लग्न उदित असून, षष्ठ स्थानी मीन राशीमध्ये रेवती नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. लग्नस्थानी मंगळ-बुध, चतुर्थात प्लुटो, पंचमात राहू, षष्ठस्थानी चंद्र, शनी, नेपच्यून, अष्टमात हर्षल, भाग्यस्थानी गुरू, लाभस्थानी शुक्र-केतू व व्ययस्थानी रवी अशी ग्रहस्थिती आहे. षष्ठ स्थानातील पौर्णिमा (चंद्र) शनी नेपच्यूनने युक्त असल्याने या महिन्यात एखादा संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता राहील. या योगामुळे मोठ्या व्यक्तींचे आजारपण किंवा तुरुंगवासाच्या घटना होण्याची शक्यता वाटते. या काळात अपहरण किंवा आत्महत्येच्या घटना वाढतील. चोरीच्या गुन्ह्यात वाढ होईल.

मोठ्या/प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील. परदेश दौऱ्यावरून टीका होईल. या काळात मोठ्या राजकीय व्यक्तींचा मृत्यू संभवतो. मोठ्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. या काळात शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहील. मोठे चढउतार होतील. शाळा, कॉलेज, विद्यापीठांमध्ये प्रवेश किंवा परीक्षा यांवरून गोंधळ अनुभवास येईल. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा महिना प्रतिकूल राहील. लहान मुले, विद्यार्थी यांच्याबाबतीत अपहरण, अपघात किंवा विषबाधा यांसारख्या घटना होण्याची शक्यता राहील.

लग्नातील तूळ राशीतील मंगळामुळे काही देशांत युद्धासारखे प्रसंग निर्माण होतील. या योगामुळे वादळे, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती संभवते. या मंगळामुळे दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना, हिंसा, जाळपोळ, बंद, निदर्शने या कारणांमुळे अशांतता निर्माण होईल. मोठे वादविवाद गाजतील. मोठी न्यायालयीन प्रकरणे या काळात गाजतील.

भाग्य स्थानातील गुरूमुळे मोठे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल. मोठे सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतील. या काळात स्त्रीवर्ग व कलाकारांना त्रास संभवतो. भारतीय खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत चांगले यश मिळेल. स्त्री वर्गावरील अन्याय-अत्याचाराच्या घटना संभवतात. या काळात सोन्या-चांदीच्या भावात घसरण होण्याची शक्यता राहील.

Bhavishyanama
Manoj Jarange: मुंडे ज्यांच्या प्रचाराला जाणार, त्या उमेदवाराला पाडणार; जरांगेंनी दंड थोपटले

लग्नातील मंगळामुळे या काळात हवेमध्ये मोठी उष्णता वाढेल. ऑक्टोबर हीट लवकर जाणवेल. यामुळे परतीचा पाऊस कमी होईल. वादळे किंवा आगीचे अपघात यामधून मोठी हानी संभवते. सेलिब्रेटींचे घटस्फोट किंवा ब्रेकअपच्या घटना या काळात संभवतात. लैंगिक अत्याचाराच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता असून, मोठे सेक्स रॅकेट उघडकीस येतील. मोठ्या व्यक्तींचे प्रेमप्रकरण या काळात गाजेल किंवा मोठ्या व्यक्तींवर विनयभंग, लैंगिक शोषणासारखे आरोप होतील. मोठे कलाकार किंवा चित्रपट या काळात वाद‌विवादात अडकतील. मोठे कलाकार, गायक किंवा मोठ्या स्त्रीच्या घटना या काळात होण्याची शक्यता राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com