Election Commission: निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ट्विटरचा राजकीय पक्षांना दणका, पोस्ट हटवल्या

Lok Sabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्ष विविध माध्यमांतून आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्ष विविध माध्यमांतून आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोगाने (Election Commission) कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

अशातच आता निवडणूक आयोगाने (Election Commission) एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील काही राजकीय पक्षांच्या पोस्ट हटवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार एक्सनेदेखील कारवाई करत पोस्ट हटवल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग सध्या अॅक्शन मोडवर असून, सोशल मीडियावरील प्रचारावरदेखील बारकाईने लक्ष ठेवत असल्याचं दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पक्षांच्या पोस्ट्स हटवल्या

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ट्विटरने (Twitter) काही राजकीय पक्षांच्या पोस्ट हटवल्या आहेत. यामध्ये, वायएसआर काँग्रेस (YSR Congress), आम आदमी पार्टी, (Aam Adami party) तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पोस्ट एक्सने हटवल्या आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यामुळं निवडणुकीच्या कालावधीत या पोस्ट हटवण्याचे आदेश देण्यात आले होते.

Election Commission
Lok Sabha Election 2024: नक्षलवाद्यांच्या 'बुलेट' रोखणार; वायुदलाचे आठ हेलिकॉप्टर 'अलर्ट'

निवडणूक आयोगाने 10 एप्रिल रोजी एक्सला मेल पाठवत या राजकीय नेत्यांच्या पोस्ट हटवण्यास सांगितलं होतं. आयोगाच्या या आदेशानुसार, एक्सने कारवाई केली आहे. तसेच या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचं कारण निवडणूक आयोगाने दिलं होतं.

आयोगाच्या या कारवाईमुळे निवडणुकांच्या काळात सोशल मीडियाच्या प्रचारावरही निवडणूक आयोगाचं लक्ष असणार आहे, असा संदेश राजकीय पक्षांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उमेदवारांना आपला प्रचार करताना काही मर्यादांचं पालन करावं लागणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com