Teacher transfer scam : प्रशासनाचा थेट सर्जिकल स्ट्राइक! 33 शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन, वेतनवाढ रोखली, नेमकं कारण काय?

Salary increment stopped News : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेदरम्यान काही जणांनी संशयास्पद कागदपत्रे सादर केली असल्याचा संशय होता.
  teachers
teachers Sarkarnama
Published on
Updated on

Akola News : आंतरजिल्हा शिक्षक बदली घोटाळ्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. हा संपूर्ण घोटाळा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या संशयास्पद कागदपत्रांमुळे उघडकीस आला आहे. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीवेळी तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतल्याचे दिसून आले. या बदली प्रक्रियेसाठी काही जणांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने थेट सर्जिकल स्ट्राइक करीत 33 शिक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले तर 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखली. ही धडक कारवाई अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी चौकशीअंती केली. प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेदरम्यान काही जणांनी संशयास्पद कागदपत्रे सादर केली असल्याचा संशय होता. यावेळी बदलीसाठी काही शिक्षकांनी वास्तव्याची चुकीची माहिती देऊन पात्रतेचा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणात तक्रारदार गणेश कुरई यांनी शिक्षण अन् आरोग्य विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली.

तक्रार करण्यात आल्यानंतर प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. या वेळी अकोला जिल्ह्यातील तब्बल 268 शिक्षकांनी बदलीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. काही जणांनी तर स्वतःला दिव्यांग दाखवणारी खोटी प्रमाणपत्रे जोडली होती तर काही महिला शिक्षिकांनी परित्यक्ता किंवा एकल महिला प्रवर्गातून लाभ मिळवण्यासाठी पतीसोबत घटस्फोट झाल्याचा खोटा बनाव रचला होता. हे सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी त्या शिक्षकावर थेट कारवाई केली.

  teachers
Deputy Collectors Suspended: १५ उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तडकाफडकी निलंबित; कोट्यवधींचे फेरफार, 'त्या' सवलतीचा गैरवापर

नावंदर यांनी चौकशीत 136 शिक्षकांपैकी दोषी आढळलेल्या 33 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले, तर 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखली आहे.आता पहिल्या टप्प्यात 33 शिक्षकांचे निलंबन आणि 65 जणांची वेतनवाढ रोखल्यानंतर, उर्वरित दोषी शिक्षकांवरही लवकरच शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

  teachers
Fake Teacher Appointment : शालार्थ घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात नवा स्फोट; बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षकाची नियुक्ती, 5 जणांवर गुन्हा

पाच अधिकाऱ्यांवर यापूर्वीच केली कारवाई

या चौकशीत 268 पैकी 136 शिक्षक नियमबाह्य बदलीप्रकरणी थेट दोषी आढळले आहेत. दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाने यापूर्वीच कडक भूमिका घेत प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह 5 अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केवळ निलंबन किंवा वेतनवाढ रोखणे पुरेशी शिक्षा नसून, दोषी शिक्षक आणि यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com