ATS मध्ये भरीव कामगिरी करणारे IPS अतुलचंद्र कुलकर्णी आता NIA चे अतिरिक्त महासंचालक

वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी (AtulChandra Kulkarni) महाराष्ट्राच्या कारागृहा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.
atulchandra kulkarni
atulchandra kulkarnisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अतिरिक्त महासंचालकपदी आज (ता. 12 मे) नियुक्ती केली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी कुलकर्णी (atulchandra kulkarni) हे महाराष्ट्राच्या कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) कुलकर्णी यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला आहे. एनआयएचे पोलीस महानिरीक्षक पद तात्पुरते एडीजी पदावर श्रेणीसुधारित करण्यात आले आहे. महाराष्ट्र केडरचे अनेक अधिकारी देशात प्रमुख पदावर आहेत. राज्याचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

सुबोध जयस्वाल हे सीबीआयचे संचालक आहेत तर रश्मी शुक्ला या देखील केंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त महासंचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर आहेत. आता कुलकर्णी यांनाही महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. देश पातळीवरील दहशतवादी कारवायांना प्रतिबंध आणि तपास करण्याचे काम या राष्ट्रीय तपास संस्थेकडे आहे. कुलकर्णी यांनी सात वर्षे 'आयबी' मध्ये काम केले आहे. प्रामुख्याने ईशान्य भारतात त्यांची 'आयबी'तील सेवा झाली. त्याचाही त्यांना आता NIA मध्ये उपयोग होणार आहे.

atulchandra kulkarni
'पवार साहेबांचा अर्धवट व्हिडीओ व्हायरल करुन फॉल्स नॅरेंटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न!'

कुलकर्णी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस दलात नांदेड येथे सहायक अधीक्षक म्हणून ते रुजू झाले होते. त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (जळगाव) आणि भंडारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. नागपूर येथे नक्षलविरोधी मोहिमेतही त्यांचा सहभाग राहिला आहे.

atulchandra kulkarni
शशिकांत शिंदेंचा ठरवून करेक्ट कार्यक्रम झाला?

त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मुंबईमध्ये सह पोलिस आयुक्त (गुन्हे) या पदावर काम केले आहे. येरवडा तुरुंगाचे अप्पर पोलीस महासंचालक सुधारसेवा असताना त्यांनी कैद्यांसाठी विविध उपक्रम सुरु केले होते. येरवडा कारागृहातून चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत यासाठी त्यांनी काही तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूकही केली होती. याचबरोबर कैद्यांसाठी क्रीडा प्रशिक्षण देखील केले होते. त्यामुळे कुलकर्णी यांच्याबाबत अनेक कैद्यांच्या मनात देखील आदर असल्याचे अनेक जण सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com