Mumbai Central Railway : मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, तब्बल 84 'लोकल' रद्द!

Mumbai local train News : मोटरमनचा मृत्यू झाला नसून आत्महत्या केल्याचे म्हणत लोकोपायलट यांचा कामात असहकार?
Mumbai Central Railway(संग्रहित)
Mumbai Central Railway(संग्रहित)Sarkarnama

Mumbai News : मुंबईत मध्य रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. शुक्रवारी एका मोटरमनच्या मृत्यूमुळे लोकोपायलट यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. यामुळे आतापर्यंत तब्बल 84 'लोकल' रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. तर रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच अडचण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार ज्या मोटरमनचा शुक्रवारी मृत्यू झाला, त्याच्याकडून लाल दिवा असतानाही रेल्वे पुढे नेण्यात आली होती. मात्र ही चूक झाल्यानंतर काहीवेळातच याच मोटरमनच्या मृत्यूची माहिती समोर आली होती. परंतु या मोटरमनचा मृत्यू हा अपघाती नसून त्याने कारवाईच्या भीतीपोटी आत्महत्या केली आहे, असा दावा रेल्वे कर्मचारी संघटनेकडून केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mumbai Central Railway(संग्रहित)
Shivsena News : पुन्हा 'उबाठा' गटाला धक्का; दोन माजी लोकप्रतिनिधींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

या प्रकारामुळे रेल्वेस्थानकांवर मुंबईकरांची मोठी गर्दी झाली आहे, सर्वसामान्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्तही मोठ्याप्रमाणावर तैनात आहे. चाकरमानी मुंबईकर रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. सीएसएमटी स्थानकावर मोटरमनच्या मुख्य केबिनसमोर प्रवासी मुंबईकरांनी गर्दी केली असून, अनेक तासांपासून ताटकळत असलेल्या प्रवाशांकडून जाब विचारला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या वेळांबाबत कुठलीही घोषणा केली जात नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

मोटरमन यांनी शनिवारी केवळ सिंगल ड्यूटी करणार, डबल ड्यूटी करणार नाही. अशी भूमिका घेतल्याने ही अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Mumbai Central Railway(संग्रहित)
Thane Politics : महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर गद्दारांना गाडा; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com