Maharashtra Police : दोन महिन्यानंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर; साडेचारशे 'एपीआय'साठी गूड न्यूज!

Maharashtra Home Minister Devendra Fadanavis Signs Police Promotion File : आचारसंहिता संपताच साडेचारशे एपीआय़च्या प्रमोशनचा पहिला आदेश,पोलिस दलात आनंद
Maharashtra Police
Maharashtra PoliceSarkarnama
Published on
Updated on

Pune News : दोन महिने सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची धामधूम नुकतीच संपली. या निवडणुकीसाठीची आचारसंहिताही संपली. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. तर, चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असल्याने आमदारही पुन्हा सक्रिय झाले आहेत. Maharashtra Police Promotion

केंद्रात एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली सही ही शेतकरी योजनेच्या वीस हजार कोटी रुपयांच्या फाईलवर करीत आपल्या कामाचा चांगला श्रीगणेशा केला. दरम्यान, आचारसंहिता संपल्याने राज्य शासनही आता कामाला लागले आहे.

लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे राज्यातील महायुती सरकार केंद्राप्रमाणे काही धडाकेबाज निर्णय घेऊ शकते. कारण चार महिन्यांतच त्यांना विधानसभेला सामोरे जायचे आहे. लोकसभा निकालाचा ट्रेंड आणि जनमत कायम राहिले, तर विधानसभेला त्यांना राज्यात सत्ता राखणे कठीण होणार आहे. म्हणून ते काही लोकप्रिय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सरकार अ‍ॅक्टिव्ह मोडवर येण्याचा पहिला निर्णय गृहखात्याचा झाला आहे. त्यांनी रखडलेल्या व थेट मॅटमध्ये गेलेल्या एपीआयच्या प्रमोशनवर शिक्कामोर्तब केले आहे. अशा आणखी काही खात्यांतील प्रलंबित बदल्या आणि बढत्यांचे संकेतही मिळाले आहेत. राज्यातील 449 सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा एपीआय यांना खोळंबलेली पदोन्नती दिली गेली. त्यात पिंपरी-चिंचवड, पुणे आयुक्तालयातील अनेक अधिकारी आहेत. या सामूहिक प्रमोशन ऑर्डरने राज्य पोलिस दलात आनंदाची भावना आहे

Maharashtra Police
NCP Sharad Pawar : जयंत पाटलांनंतर जितेंद्र आव्हाड घेणार अजित पवार अन् त्यांच्या टीमशी पंगा ?

आचारसंहितेतून सुटका झाल्याने आमदारही सक्रिय झाले आहेत. त्यातही सत्ताधारी महायुतीचे आमदार अ‍ॅक्शन मोडवर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे Mahesh Landge यांनी आचारसंहिता दूर होताच मतदारसंघातील नागरी प्रश्नासंदर्भात पिंपरी महापालिका प्रशासनाबरोबर लगेच बैठक घेतली. त्यात मॉन्सूनपूर्व तयारीसह विविध प्रश्नाचा आढावा त्यांनी घेतला.

गेल्या दोन वर्षांपासूवन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राजवट असल्याने मनमानी कारभार सुरु आहे. तळेगाव (ता.मावळ) नगरपरिषदेने, तर घरभाड्यावरही घरपट्टीकर लावला असून असा पराक्रम करणारी ती राज्यातील पहिली नगरपरिषद आहे. त्यामुळे त्याविरोधात अजित पवार गटाचे स्थानिक आमदार सुनील शेळके Sunil Shelke यांनी रणशिंग फुंकले आहे. एकूणच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन असे दोघेही आता झटून कामाला लागल्याचे दिसून आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Maharashtra Police
Congress & MVA : लोकसभेनंतर काँग्रेसचा 'कॉन्फिडन्स' वाढला; विधानसभेत 'एकला चलो रे'ची भाषा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com