Pune News : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असूनही राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धडाका सुरुच ठेवला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची शुक्रवारी नागपूरला महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुदतपूर्व बदली केली. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांची पुण्याहून (राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक) मुंबईला (अतिरिक्त महापालिका आयुक्त) म्हणून बदली झाली होती. (Latest Marathi Political News)
गेल्यावर्षी ३० जूनला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंद-फडणवीस सरकारने बदल्यांचा सुरु केलेला सपाटा सुरुच आहे. त्यात अगोदरच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील अनेक 'आयएएस', 'आयपीएस' अधिकाऱ्यांची मुदतपूर्व उचलबांगडी झाल्याने काही बदल्या वादात सापडल्या आहेत. त्यात पिंपरी महापालिकेतील काही अधिकारी आहेत. तर, आज टर्म पूर्ण होण्याआधीच बदली झालेले हर्डीकर यांनीही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेले आहे.
हर्डीकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हर्डीकरांना नागपुरहून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून आणले होते. नंतर महाविकास आघाडी सरकार येताच त्यांची पुण्यात मुद्रांक विभागाचे प्रमुख म्हणून कोरोना काळात बदली झाली होती.
हर्डीकरांनी आय़ुक्त म्हणून पिंपरीत काम करताना कोरोनाबरोबर रहायचे आहे, जगायचे आहे, असे सांगत त्यांनी कोरोनाची साथ लगेच जाणार नाही, असा द्रष्टेवजा इशारा दिला होता. तो नंतर खरा ठरला. राज्यात सत्ताबदल होऊन महाविकास आघाडी सरकार आल्यांनतर हर्डीकर यांची मुंबईत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली होती. तेथे रुजू होताच दुसऱ्याच दिवशी काही दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते. आता तेथून अवघ्या तीन महिन्यात त्यांची आज पुन्हा नागपूरला बदली झाली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.