IAS Transfer in Maharashtra : ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानंतर आता दहा ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने आज बदल्या केल्या. त्यात वरचेवर बदली होणारे तुकाराम मुंडे यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीचे गणित लक्षात घेऊन काही बदल्या केल्या गेल्या आहेत. मुंबई महापालिकेत सत्ताबदल करण्याच्या हेतूने तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मर्जीतील श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar) यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.त्याअगोदर ते पुण्यात मुद्रांक महानिरीक्षक होते. त्यापूर्वी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केलेले आहे. त्यांना फडवणीसांनी ते मुख्यमंत्री असताना नागपूरहून पिंपरी-चिंचवडला आणले होते.
आता त्यांनीच हर्डीकरांना मुंबईत नेले आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेले आणि सध्या 'महापारेषण'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असलेले दिनेश वाघमारे यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना नेण्यात आले आहे. राधिका रास्तोगी यांची नियुक्ती अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाली आहे.
गेल्या आठवड्यात (२४ एप्रिल) राज्य पोलिस दलात मोठा खांदेपालट झाला. राज्य सरकारने २५ जणांच्या पदोन्नतीसह ३२ ज्य़ेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी होते. त्यानंतर आज काही अतिरिक्त मुख्य सचिवांसह दहा ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या. त्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आय़ुक्त डॉ अभिजित चौधरी यांची बदली सहआय़ुक्त राज्य कर विभागात करण्यात आली.
त्या पदावरील जी. श्रीकांत यांना डॉ. चौधरी यांच्या पदावर आणले गेले. तुकाराम मुंडे यांची पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव तर टेक्सटाईल संचालक पी. शिवशंकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) साईबाबा संस्थान, शिर्डी येथे केली गेली आहे. 'पीएमआरडीए'चे अध्यक्ष म्हणून पुण्यात काम केलेले महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. नितीन करीर यांना वित्त विभाग देण्यात आला आहे. राज्य अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद म्हैसकर यांची बदली सार्वजनिक आरोग्य विभागात करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.