Transfer of police officers : कोल्हापूरचे 'एसपी' शैलेश बलकवडेंना साईड पोस्टिंग; त्यांच्या जागी महेंद्र पंडितांची नियुक्ती

IPS Mahendra Pandit News : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
IPS Shailesh Balkawade, Mahendra Pandit
IPS Shailesh Balkawade, Mahendra Pandit Sarkarnama
Published on
Updated on

IPS Shailesh Balkawade News : राज्य सरकारने पुन्हा पोलिसांच्या बदल्या केलेल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे (Shailesh Balkawade) यांची बदली पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून झाली आहे तर बलकवडे यांच्या जागी कोल्हापूरचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मुंबईचे पोलीस उप आयुक्तत महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापूरचे (Kolhapur) एसपी शैलेश बलकवडे यांना साईड पोस्टिंग देण्यात आली आहे. त्याच बरोबर बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त योगेश गुत्ता यांची बदली पोलीस अधीक्षक नागरी हक्का संरक्षण पदावर नांदेडला बदली करण्यात आली आहे. अकोल्याच्या अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांची बदली नाशिक शहर उप पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

IPS Shailesh Balkawade, Mahendra Pandit
Khed APMC News : आमदार मोहिते विरोधकांचा एक होण्याचा आणखी एक प्रयत्न खेड बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत फसला

तर पोलीस (Police) प्रशिक्षण केंद्र जालनाचे अभय डोंगरे यांची अपर पोलीस अधीक्षक अकोला या पदावर बदली करण्यात आली आहे. दरम्यान, महेंद्र पंडित यांनी नांदेड येथे दोन वर्ष उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर २०१७ मध्ये ते गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर त्यांची मुंबईचे पोलीस उप आयुक्तत म्हणून बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांना कोल्हापूरमध्ये जिल्हा अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

IPS Shailesh Balkawade, Mahendra Pandit
New Parliament Inauguration : नवीन संसदेच्या उद्घाटनावर 19 विरोक्षी पक्षांचा बहिष्कार; पण 'हे' प्रमुख पक्ष देणार मोदींना साथ

मात्र, कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे यांना साईड पोस्टिंग दिल्यामुळे त्याची चर्चा होत आहे. त्यांना पुणे येथील राज्य पोलीस दलाचे समादेशक म्हणून बदली करण्यात आल्यामुळे आश्चिर्य व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com