Lok Sabha Election 2024 : नगर पोलिस अ‍ॅक्शन मोडवर, 17 हजारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Ahmednagar Police : दोन किंवा त्यापेक्षा अधिक फौजदारी गुन्हे दाखल असलेल्यांवर मोका, हद्दपार, स्थानबद्ध आणि प्रतिबंधात्मक कारवाई निश्चित होणार आहे.
maharashtra police
maharashtra policesarkarnama

लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) कायदा-सु्व्यवस्था नगर जिल्ह्यात अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात अर्थात 13 मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नगर जिल्ह्यातील 17 हजार 899 गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी केल्याची माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांसाठी ( Lok Sabha Election 2024 ) 13 मे रोजी मतदान होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीतील संभाव्य उमेदवार प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी नगर जिल्हा पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आहे. कायदा-सुव्यवस्थेला अडथळे ठरणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची तयारी केली आहे. नगर जिल्ह्यातील सुमारे 17 हजार 899 गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई होणार आहे. यात विविध गुन्हे दाखल असलेले 9 हजार 425 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या जाणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

1 हजार 409 जणांविरुद्ध गाव ते जिल्हा पातळीपर्यंत प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. 4 हजार 546 संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय 182 जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे. यातील काही जणांना तडीपारदेखील करण्यात आले आहे. दहा सराईत गुन्हेगारांना 'एमपीडीए'नुसार स्थानबद्ध केले जाणार आहे. तसेच, मुंबई पोलिस ( Mumbai Police ) अधिनियमातील विविध तरतुदींनुसार 688 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली

maharashtra police
Maharashtra Police : पोलिसांना मोठा दिलासा; अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी

पोलिस ठाण्यानिहाय आढावा

दोन किंवा त्यापेक्षा अधिक फौजदारी गुन्हे दाखल असलेल्यांवर मोका, हद्दपार, स्थानबद्ध आणि प्रतिबंधात्मक कारवाई निश्चित होणार आहे. यासाठी नगर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यानिहाय आढावा घेऊन कारवाई केली जात आहे. तसेच, नगर जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये रूट मार्च, नाकाबंदी, फिक्स पॉइंटवर गस्त, अवैध धंद्यांवर कारवाई, अमली पदार्थांच्या वाहतुकीवर कारवाई, शस्त्रांची वाहतूक, संवेदनशील मतदान केंद्राची यादी नगर जिल्हा पोलिसांकडून केली जात आहे.

परवानाधारकांचे शस्त्र जमा होणार

नगर जिल्ह्यात सुमारे 3 हजार 200 परवानाधारक शस्त्रधारी आहेत. या व्यक्तींचे शस्त्र जमा करून घेण्याची कारवाई जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून संयुक्तमपद्धतीने होणार आहे. यासाठी नियमावली तयार केली जात आहे. या व्यक्तींनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र आणि त्याचा परवाना घेतला होता. निवडणुकीचा कालावधीत हे शस्त्र जमा करून घेतली जाणार आहेत.

R

maharashtra police
Mumbai Prison Department 2024: मुंबई कारागृहासाठी पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com