Pune News : सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कडक पावले उचलली आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनला दारू विक्रीसंदर्भात आदेश दिले आहे. Lok Sabha Eletion 2024
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आचारसंहिता संपेपर्यंत शहरासह जिल्ह्यातील विविध प्रकारच्या दारू विक्रीचे नवे लायसन्स देणे, त्यांचे नूतनीकरणासह दुरुस्ती किंवा हस्तांतर या सर्व प्रक्रियेवर बंदीचे आदेश काढले आहेत, तर मतदानाच्या 48 तास आधीपासून मतदानाच्या सर्व प्रक्रियेसह मतमोजणीपर्यंत ड्राय डे म्हणून घोषित केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ हे चार मतदारसंघ आहेत. त्यातील बारामती मतदारसंघासाठी 7 मे रोजी, तर तर पुणे, मावळ आणि शिरूरसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बारामतीत 5 ते 7 मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होईपर्यंत, तर पुणे, मावळ आणि शिरूर येथे 11 ते 13 मे रोजी मतदान संपेपर्यंत संपूर्ण ड्राय डे असणार आहे. यासह मतमोजणी म्हणजेच 4 जून रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व प्रकारची दारूची आणि तत्सम दुकाने बंद राहतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात संबंधित दिवशी सर्व प्रकारची दारू विक्रीस मनाई असणार आहेत. मात्र, परवानाधारकांना दारू निर्मिती केली जाणार आहे. मात्र, विक्री, वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी दिवसे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.