Maharashtra Politics : गोष्ट महिला मुख्य सचिवांची!

Maharashtra Politics : महाराष्ट्राला कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महिला मुख्य सचिव मिळाल्या. चंद्रा अय्यंगार, श्रीमती मेधा गाडगीळ अशा काही महत्त्वाच्या महिला अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठता असूनदेखील या पदासाठी निवडले गेले नाही. या पदासाठी सुजाता सौनिक यांची निवड झाली.
Maharashtra Women Chief Secretaries
Maharashtra Women Chief SecretariesSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्राला कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महिला मुख्य सचिव मिळाल्या. चंद्रा अय्यंगार, श्रीमती मेधा गाडगीळ अशा काही महत्त्वाच्या महिला अधिकाऱ्यांना सेवा ज्येष्ठता असूनदेखील या पदासाठी निवडले गेले नाही. या पदासाठी सुजाता सौनिक यांची निवड झाली.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक असे महिलाराज आलेले आहे. अर्थात महिलांना आनंद देणारी ही घटना कदाचित भूतकाळातील जमा होण्याची शक्यता आहे. कारण मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जागा रिक्त झाली आहे आणि त्या जागेसाठी अर्ज मागवले गेले आहेत.

सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांचा अर्ज तेथे पोहोचला आहे. सुजाता यांच्या मुख्य सचिवपदाचा कालावधी आगामी दोन वर्षांत संपतो, पण मुख्य निवडणूक (Election) आयुक्तपदी त्यांची निवड झाली तर त्यांना पुढची पाच वर्षे मिळतील. या पाच वर्षांकडे डोळे ठेवून सुजाता सौनिक यांनी या पदासाठी अर्ज केला असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

Maharashtra Women Chief Secretaries
Maharashtra Assembly Politics : सावध ऐका... प्रचाराच्या हाका...

महाराष्ट्राच्या नोकरशाहीत अनेक महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. पदांवरील व्यक्ती भविष्यातील संधीकडे डोळे ठेवून पदाचा राजीनामा देऊ लागले आहेत. नितीन गद्रे हे अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून प्रसिद्ध. गृह विभागातल्या जबाबदारी नंतर ते काही काळ सामान्य प्रशासन हे अत्यंत महत्त्वाचे खाते सांभाळत होते.

मात्र निवृत्तीला दोन वर्षे बाकी असताना ‘मॅट’ या ठिकाणी रिक्त जागा दिसताच तरी यांनी तिथे अर्ज भरला आणि त्यांची निवड देखील झाली. सेवानिवृत्तीला दोन वर्षांचा काळ असताना अशा प्रकारे राजीनामा देत गद्रेंसारख्या उत्तम अधिकाऱ्यांनी स्वतःची सोडवणूक का करून घेतली असा प्रश्न आहे.

Maharashtra Women Chief Secretaries
Transfer Administrative Officer: आमदारांच्या 'अर्थकारणा'तून मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी वाद झाल्यानंतर व्ही. राधा यांनी बदली मागितली म्हणे. गद्रे यांच्या रिक्त आलेल्या जागेवर त्यांची निवड झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे इक्बालसिंग हे नवे सरकार येताच नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेले. वरिष्ठ सनदी अधिकारीपदांवर पुढे काय काय होते ते बघावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com