

Maharashtra government employees news : राज्य सरकारने सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार आता महागाई भत्त्याचा दर ५८ टक्के करण्यात आला आहे. आतापर्यंत हा दर ५५ टक्के एवढा होता. महागाई भत्त्याच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आज महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय काढला आहे. त्यात म्हटले आहे की, शासन आदेश देत आहे की, ता. १ जुलै, २०२५ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५५ टक्के वरुन ५८ करण्यात यावा. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी.
जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असेही सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे, त्याचप्रकारे यापुढे लागू राहील, असेही सरकारने म्हटले आहे. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा, असे सरकारने शासन निर्णयात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.