राष्ट्रपतींच्या खासगी सचिवपदी मराठी चेहरा; संपदा मेहतांची नियुक्ती

Sampada Mehta : मेहता या २००८ च्या ‘आयएसएस’ तुकडीच्या आधिकारी आहेत.
Sampada Mehta
Sampada MehtaSarkarnama

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या (President Draupadi Murmu) खासगी सचिवपदी मूळच्या पुणेकर असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) संपदा सुरेश मेहता (Sampada Mehta) यांची नियुक्ती झाली आहे. मेहता यांच्या नियुक्तीने प्रशासकीय सेवेतील मराठी चेहऱ्याला राष्ट्रपती भवनात काम करण्याची संधी मिळाली आहे.

Sampada Mehta
बेपत्ता माजी नगराध्यक्षा स्वप्नाली सावंतांची हत्या; पतीनेच काढला काटा?

मेहता या २००८ च्या ‘आयएसएस’ तुकडीच्या महाराष्ट्र केडरच्या आधिकारी आहेत. या पूर्वी त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी, जीएसटी विभागाच्या मुंबईच्या सहसंचालक तसेच जळगाव, हिंगोली, नाशिकसह विविध जिल्ह्यात काम केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्या दिल्लीत केंद्रीय वित्त विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत.

Sampada Mehta
दुपारची झोप टाळून उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना वेळ दिला; शिंदे गटाची खोचक टीका

पुण्यातील हुजूरपागा शाळेत मेहता यांचे शालेय तर, स. प. महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. २००४ साली त्या सीए झाल्या. त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून २००८ च्या बॅचमध्ये त्यांची निवड झाली. नव्या नियुक्तीबाबत त्या म्हणाल्या, ‘‘ राष्ट्रपतींबरोबर काम करण्याची संधी मिळणे, हा प्रशासकीय सेवेतील मोठा मान आहे. या पदावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com