MHADA News : खबरदार! संक्रमण शिबिरातील गाळे विकाल तर...'या' कलमानुसार होणार गुन्हा दाखल

MHADA transition camp news : क्रमण शिबिरातील गाळे विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश म्हाडा मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे दिले आहेत. त्यामुळे बेकायदा गाळे विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
MHADA
MHADASarkarnama
Published on
Updated on

MHADA News : म्हाडाच्या जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाविषयी नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. त्यानुसार म्हाडाच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास केला जातो. पुनर्विकास करताना त्या इमारतीतील रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी म्हाडा रहिवाशांना तात्पुरत्या संक्रमण शिबिरात राहण्याची सोय करते.

मात्र इमारत पुन्हा तयार झाल्यानंतर घराचा ताबा घेऊन संक्रमण शिबिरातील मिळालेले गाळे रहिवाशी परस्पर विकत असल्याच्या अनेक तक्रारी म्हाडाकडे (MHADA) आल्या आहेत. अशा घटनांमुळे म्हाडाचे करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याने म्हाडा दक्षता विभागाने आता अशा गाळे विक्री करणाऱ्या विरोधात कलम 405, 406 नुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

यामुळे बेकायदेशीरपणे गाळे हस्तांतरण करणार्‍यांचे आता धाबे दणाणले आहेत. मुंबईत 1000 पेक्षा अधिक गाळे धारकांनी असे गाळे परस्पर विकले आहेत यामुळे म्हाडाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

MHADA
ACB action Pune Mhada : म्हाडाच्या 90 लाखांच्या फ्लॅटसाठी मागितली पावणेतीन लाखांची लाच !

इमारतीचा पुनर्विकास करताना रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून म्हाडातर्फे संक्रमण शिबिरात घरे उपलब्ध करून दिली जातात. संक्रमण शिबिरातील ही घरे रहिवाशी परस्पर विकतात किंवा काही लोक पुनर्विकास होऊनही घराचा ताबा सोडत नाहीत. संक्रमण शिबिरातील रहिवाशांकडूनच भाडे तत्वावर राहणार्‍या रहिवासांकडून आवाच्यासव्वा भाडे आकारले जाते.

काही घुसखोरांनी भाडे थकवल्यामुळे आणि परस्पर विकल्याने म्हाडाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता संक्रमण शिबिरातील गाळे विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश म्हाडा मुख्य दक्षता अधिकाऱ्यांचे दिले आहेत. त्यामुळे बेकायदा गाळे विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

MHADA
Mhada Lottery : म्हाडाचं घर लागूनही परत करावं लागलं; गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितला आपला अनुभव

ज्या रहिवाशाने जाणीवपूर्वक संक्रमण गाळ विकून म्हाडाची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर कलम 405, 406 नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी विनीत अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com