ACB action Pune Mhada : म्हाडाच्या 90 लाखांच्या फ्लॅटसाठी मागितली पावणेतीन लाखांची लाच !

Anti-Corruption Bureau action : पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांच्या नावाने पैसे मागणाऱ्या कंत्राटी प्रोजेक्ट मॅनेजरला अँटी करप्शन ब्युरोने केली अटक
ACB action  Mhada
ACB action MhadaSarkarnama

Pune News : म्हाडाच्या पुणे विभागाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने पावणेतीन लाखांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने कारवाई केली असून ही लाच घेणाऱ्या म्हाडाच्या प्रोजेक्ट मॅनेजरला अटक केली आहे. या प्रकारामुळे लाच मागण्याचे लोण आता म्हाडाच्या कार्यालयापर्यंत पोहचले आहे.

पुणे स्टेशन भागातील एका हॉटेलच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. बंडगार्डन पोलिस (Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित व्यंकटराव जिचकार (वय 34, रा. वाकड) असे अटक करण्यात आलेल्या प्रोजेक्ट मॅनेजरचे नाव आहे. तो म्हाडामध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करत आहे. पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांच्या नावाने आरोपीने दोन लाख 70 हजार रूपयांची लाच मागितली होती. म्हाडा योजनेतील सदनिका फेरवितरण पद्धतीने मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर तक्रारदाराकडे ही लाच मागण्यात आली.

या प्रकरणातील तक्रारदाराला म्हाडाच्या पुणे विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये सदनिका मिळाली होती. या फ्लॅटची किंमत 90 लाख रूपये इतकी होती. म्हाडाच्या वतीने काढण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये सदनिका व्यवहारातील रक्कम कशी भरायची, याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने या व्यवहारातील हप्ता भरलेला नव्हता. परिणामी सदनिका हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली होती. यामुळे तक्रारदार यांनी या सदनिकेचे फेरवितरण होण्याबाबत आणि त्याचे चलन मिळण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात अर्ज दिला होता. हे काम लवकर व्हावे यासाठी तक्रारदार यांनी आरोपी अभिजित जिचकार तसेच मुख्याधिकारी अशोक पाटील यांची भेट घेतली होती.

ACB action  Mhada
SP Nivedita Naidu : IPS मॅडम, तुम्हाला सलाम! आठ महिन्यांच्या गर्भवती तरीही रात्रभर घालतात गस्त...

या फ्लॅटचे फेर वितरण करून आरटीजीएस चलन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागण्यात आली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. आरोपी जिचकार याने या कामासाठी म्हाडाचे (Mhada) मुख्याधिकारी अशोक पाटील यांच्यासाठी २ लाख २० हजार रुपयांची आणि स्वत:साठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. हे पैसे घेण्यासाठी तक्रारदार यांना आरोपी जिचकार यांनी पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलाविले. तेथे सापळा लावून २ लाख ७० हजार रुपयांची लाच स्विकारताना जिचकार याला पकडण्यात आले. याप्रकारामुळे म्हाडाच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

ACB action  Mhada
SP Nivedita Naidu : IPS मॅडम, तुम्हाला सलाम! आठ महिन्यांच्या गर्भवती तरीही रात्रभर घालतात गस्त...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com