Mumbai News : गृह मंत्रालयात नवा बनावट कागदपत्र स्कॅम उघड झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणात मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तत्कालीन गृहविभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
गृह मंत्रालयातील बनावट कागदपत्रे प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. यामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. न्यायाधीश स्वप्नील तवशीकर यांनी कुलाबा पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी 14 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात तात्कलिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse patil) यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
कुलाबा पोलीसांनी (Kulaba Police) दाखल केलेल्या केसमधील आरोपी, शेखर जगताप आणि किशोर भालेराव यांचा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी 14 मार्चपर्यंत आरोपी स्पेशल सरकारी वकील शेखर जगताप, तत्कालीन गृहविभाग उपसचिव यांना, 14 मार्चपर्यंत, कठोर कारवाईपासून संरक्षण दिले आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरकारी वकील अजित चव्हाण यांनी जोरदार युक्तिवाद केला. या पुर्ण प्रकरणाची, उच्चस्तरीय गोपनीय चौकशी झाली होती. तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव या चौकशीत दोषी आढळले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गृह मंत्रालयाने किशोर भालेराव यांना निलंबित केले आहे. कोणतीही सक्षम आणि कायदेशीर मान्यता न घेता, भालेराव यांनी बनावट आदेशपत्र जारी केल्याचे चौकशी अहवालात उघड झाले आहे.
दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय गोपनीय चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयानं किशोर भालेराव यांना निलंबित केलं आहे. कोणतीही सक्षम आणि कायदेशीर मान्यता न घेता, भालेराव यांनी बनावट आदेशपत्र जारी केल्याचं, चौकशी अहवालात उघड झालं आहे.
(Edited By : Sachin Waghmare)