

Pune News: कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता जिद्दीने आणि सातत्याने तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळते हे एका पोलीस निरीक्षकान दाखवून दिले. वर्षभरापूर्वी दुचाकीच्या अपघातात पायाला गंभीर दुखापत झाल्यानंतरही केवळ जिद्दीच्या बळावर त्यांनी सायकलवर अवघ्या साडेसात दिवसात सतराशे किलोमीटरचे अंतर कापून जगन्नाथ पुरीची यात्रा पूर्ण केली. ही किमया साधली लोणावळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अजय दरेकर यांनी.
गंभीर अपघातातून स्वतःला सावरत सायकलचा छंद जोपासला. सहा महिन्यांचे विश्रांती घेत त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन सराव केला. हा अशक्यप्राय प्रवास पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. अजय दरेकर हे मुळचे वडगाव मावळ येथील आहेत. पोलीस खात्यात शिपाई म्हणून रुजू झाल्यानंतर आता त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
नोकरी करीत असतानाच दरेकर यांनी आपला सायकलचा छंद जोपासला. त्यांना धार्मिक क्षेत्राची आवड असल्याने सायकलवर नेहमीच विविध धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी ते भेटी देत असतात. पण वर्षभरापूर्वी 11 नोव्हेंबर रोजी काम आटोपून लोणावळ्यावरून ते घरी जात असताना त्यांची मोटार सायकल वडगाव मावळ जवळील जांभूळ फाटा येथे स्लीप झाली.
या अपघातात गाडी पायावर पडल्याने त्यांच्या डाव्या पायास गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊन पायात 2प्लेट व 13 स्क्रू होते. नोकरीला जाणे ही अशक्यप्राय होते तर सायकलिंगचा छंदही बाजूला ठेवावा लागणार होता. डोळ्यांमध्ये अश्रू शिवाय काही पर्याय नव्हता. त्यावेळी असं वाटलं होतं सर्व संपलं. परंतु पत्नी मुले यांनी दिलेली साथ आणि पाठिंबा यामुळेच फिनिक्स पक्षाप्रमाणे एका वर्षात भरारी घेऊन पुन्हा सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर सायकल चालवायला सुरुवात केली.
संतुलीत आहार घेऊन ते दररोज मावळ परिसरात सायकलचा सराव केला. त्यानंतर मित्रांनी जगन्नाथपुरीला जाण्याची कल्पना मांडली आणि त्यांनी तत्काळ होकार दिला. सुरुवातीला एवढे मोठे अंतर कापले जाईल की नाही शंका होती मात्र मित्रांनी आणि घरच्यांनी आधार दिला आणि त्यांच्या इच्छेला बळ मिळाले.
मित्र युवराज पाटील यांच्या नियोजनाखाली दरेकर यांच्यासह चार जणांनी पुण्यातून जगन्नाथ पुरी धामची यात्रा करण्यास निघाले. 1700 किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेसात दिवसांमध्ये पूर्ण करत बुधवारी जगन्नाथ पुरीमध्ये चारही मित्र पोहोचले. याच दिवशी अजय दरेकर यांचा अपघात झाला होता.
पायाचे फ्रॅक्चर पाहता पुन्हा सायकल चालवता येणार नाही असेच सगळ्यांना वाटले. मात्र जिद्द सराव आणि मित्र आणि घरातल्या लोकांनी दिलेला पाठिंबा यामुळे जिद्दीने यात्रा पूर्ण केली. जगनाथ पुरी येथे पोहोचल्यानंतर सायकल उंचावत फोटो काढले. त्यांनी हा आनंदाचा,भावनिक क्षण सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. नेटकरी त्यावर शुभेच्छाचा वर्षाव करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.