RBI Governor Post : आता प्रश्न आहे...'कौन बनेगा गव्हर्नर'?

RBI Governor Post Now the question is Who will become the governor : चार महिने शिल्लक असले तरी हा प्रश्न येण्याचे कारण म्हणजे वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना मंत्रिमंडळ सचिवपदासाठी मिळालेली बढती.
T V Somanathan
T V SomanathanSarkarnama
Published on
Updated on

RBI Governor Post : सरकारच्या वर्तुळात आता कुजबूज आहे ती एकाच प्रश्नाची - कोण बनेगा रिझर्व बँक गव्हर्नर? सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे. तसे चार महिने शिल्लक असले तरी हा प्रश्न येण्याचे कारण म्हणजे वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन यांना मंत्रिमंडळ सचिवपदासाठी मिळालेली बढती.

नोटबंदी नंतरच्या सरकारसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीच्या काळात, अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव राहिलेले शक्तिकांत दास यांच्याकडे डिसेंबर २०१८ मध्ये रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नर पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. इतिहासाचे विद्यार्थी असलेले शक्तिकांत दास यांनी ही कामगिरी चोख बजावली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा यांची मर्जीही संपादन केली.

T V Somanathan
Kangana Ranaut : बेताल कंगना..! 'या' विधानांमुळे ओढवून घेतला वाद..!

त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन रिझर्व बँकेचे गव्हर्नर (Governor) बनणार अशी सत्ता वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. स्वतः अर्थशास्त्राचे विद्यार्थी, कॉस्टिंगची पदवी, त्यातही सीए झालेले आणि जोडीला अर्थशास्त्रात पीएचडी, याशिवाय पंतप्रधान कार्यालयामध्ये आर्थिक धोरणावर काम केल्याचा गाठीशी असलेला अनुभव आणि पुन्हा आर्थिक व्यवहार विभागाचे सचिवपद अशी भरगच्च अनुभवाची शिदोरी गाठीशी असल्याने सोमनाथन यांच्याकडे रिझर्व बँकेचे भावी गव्हर्नर म्हणून पाहिले जात होते. साहजिकच त्यांना मंत्रिमंडळ सचिव पदावर मिळालेली बढती नव्या प्रश्नाला जन्म देऊन गेली आहे ती म्हणजे, कौन बनेगा रिझर्व बँक गव्हर्नर?

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com