IPS Transfer : विधानसभा निवडणूक, गणेशोत्सवाच्या तोंडावर सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंकडे पुण्यातील मोठी जबाबदारी

IPS Transfer News : राज्यभरातील काही महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोनच दिवसावर गणेशोत्सव आला असल्याने राज्याच्या गृह विभागाने 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
IPS Officers Transfers
IPS Officers Transferssarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील काही महत्त्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोनच दिवसावर गणेशोत्सव आला असल्याने राज्याच्या गृह विभागाने 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये मुंबई व पुणे शहरातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी सायंकाळी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबई आणि पुण्यातील काही महत्त्वाच्या आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि पुणे शहरात गणेशोत्साव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येतो.

मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. त्याशिवाय पुण्यातील गणेशोत्सव राज्यभर प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक दर्शनासाठी येतात.

गेल्या काही दिवसांत पुण्यात झालेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) केल्या आहेत. राज्याच्या गृह विभागाने 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये तेजस्वी सातपुते यांना पुण्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे बृहन्मुंबईचे पोलीस उपआयुक्त पदाचा पदभार होता.

त्यानंतर संदीप सिंह गिल्ल, पंकज देशमुख, राजतिलक रोशन, निमित्त गोयल आणि विजय चव्हाण यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे पुणे शहर उपायुक्त पदाचा पदभार आहे.

IPS Officers Transfers
BJP News : भाजपचा पाय खोलात; विधानसभेच्या तोंडावर 'नाफेड'ने कांद्याचे दर पाडले?

पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीण अधीक्षक पदावरुन मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी गृह विभागाकडून हा बदलीचा आदेश प्राप्त झाला आहे.

अ. नाव बदलीने पदस्थापन

1. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण)

2. पंकज देशमूख पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

3. तेजस्वी सातपुते पोलीस उप आयुक्त, पुणे शहर

4. राजतिलक रोशन सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई.

5. निमित गोयल पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

6. विजय चव्हाण प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर.

IPS Officers Transfers
Dhule Assembly Election : धुळ्यातील भाजपच्या गडावर वर्चस्व कुणाचं? काँग्रेस, 'एमआयएम'मध्ये रस्सीखेच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com