Dhule Assembly Election : धुळ्यातील भाजपच्या गडावर वर्चस्व कुणाचं? काँग्रेस, 'एमआयएम'मध्ये रस्सीखेच

Political News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Dhule Assembaly Election
Dhule Assembaly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Dhule Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दौरे, सभा, बैठका, पक्षप्रवेश अशा घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचे सत्र सुरु झाले आहे.

विधानसभेची मोर्चेबांधणी करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. धुळे जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला होता. मात्र, अलीकडच्या काळात या ठिकाणी भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसविरुद्ध भाजप (Bjp) असा संघर्ष पाहवयास मिळणार आहे.

धुळे जिल्हा विधानसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. या पाचही विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत झाली होती. त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दोन वर्षापूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचा परिणाम येथील राजकारणावर मोठ्या प्रमाणात जाणवतो. या ठिकाणी 2019 सालच्या निवडणुकीत एमआयएमने धुळ्यात प्रथमच वर्चस्व निर्माण केले.

त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यातच काँग्रेस, भाजप, अपक्ष आणि एमआयएम या सर्वच पक्षांचा वरचष्मा याठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

धुळे मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय घडले?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांच्यात तिरंगी लढत झाली.

यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या विजयी झाल्या आहेत. बच्छाव याना 5 लाख 83 हजार 866 मते मिळाली तर भामरे यांना 5 लाख 80 हजार 035 मते मिळाली. या निवडणुकीत केवळ तीन हजार मताने डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपच्या माजी मंत्री सुभाष भामरे यांचा पराभव केला. धुळे जिल्ह्यात लोकसभेत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे.

2009 मध्ये भाजपने प्रताप सोनवणे यांना धुळ्यातून उमेदवारी दिली होती. त्यांनी अंबरीश पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष भामरे यांना संधी मिळाली. त्यांनीही अंबरीश पटेल यांच्या विरोधात सव्वालाखांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळवला.

2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने कुणाल रोहिदास पाटील यांना उमदेवारी दिली होती. पण, त्यांचाही भामरे यांनी पराभव केला. या निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपने विधानसभा निवडणुकीत धुळ्यातील मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. यामुळे येत्या काळात जिल्ह्यात भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत बघायला मिळणार आहे.

Dhule Assembaly Election
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंची 'ती' कबुली; 'मविआ'साठी ठरणार आयती संधी?

धुळे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल :

धुळे जिल्हा विधानसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा शिरपूर आणि साक्री हे पाच विधानसभा मतदारसंघ येतात. शिंदखेडा, शिरपूर या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार आहेत. धुळे ग्रामीणमधून काँग्रेसने आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघात एमआयएमचा आमदार आहे.

धुळे जिल्ह्यातील आमदारांची यादी

साक्री विधानसभा- मंजुळा गावित (अपक्ष)

धुळे ग्रामीण विधानसभा - कुणाल पाटील (काँग्रेस)

धुळे शहर विधानसभा - फारुक शाह

सिंदखेडा विधानसभा - जयकुमार रावल (भाजप)

शिरपूर विधानसभा - काशिराम पावरा (भाजप)

Dhule Assembaly Election
Narayan Rane News : भाजप खासदार नारायण राणेंचा सर्वात मोठा दावा; म्हणाले,'उद्धव ठाकरेंनी मला फोन केला अन् आदित्यला...'

2019 मधील लढतीत नेमके काय घडले

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ :

धुळे शहर मतदारसंघातून 2019 साली शिवसेनेचे हिलाल माळी आणि अनिल गोटे यांच्यात मुख्य लढत झाली होती. मात्र धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे डॉ. फारुक शहा हे विजयी झाले होते. फारुक शाह यांनी 3 हजार 307 मतांच्या फरकाने विजय मिळवत या विधानसभा मतदारसंघात गुलाल उधळला.

या निवडणुकीत शिवसेना व अपक्ष उमेदवाराच्या मत फुटीमुळे एमआयएमचे डॉ. शहा हे विजयी झाले. या मतदारसंघात पुन्हा एमआयएमकडून डॉ. फारुक शहा हे इच्छुक आहेत. दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी चुरस आहे.

Dhule Assembaly Election
Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंच्या घरी जाऊन 2 लाख द्या! हायकोर्टाने कुणाला दिला आदेश, काय आहे प्रकरण?

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ :

या मतदारसंघात 2019 साली भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात लढत झाली होती. या ठिकाणी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. कुणाल पाटील यांनी ज्ञानज्योती पाटील यांचा 14 हजार 564 मतांनी पराभव करून जागा जिंकली होती.

या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसकडून कुणाल पाटील इच्छुक आहेत. यावेळेस त्यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटणार यावरून चुरस आहे. जागा कोणाच्या वाट्याला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

Dhule Assembaly Election
Dharashiv Assembly Election : धाराशिवमधील सेनेच्या बालेकिल्ल्यात विधानसभेला कोण बाजी मारणार ?

सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ :

सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. 2019 साली याठिकाणी भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल आणि राष्ट्रवादी काँग्रेसाचे संदीप बेडसे यांच्यात लढत झाली होती. यात जयकुमार रावल यांचा विजय झाला होता. जयकुमार रावल यांनी संदीप बेडसे यांचा 42 हजार 915 मतांनी पराभव केला होता.

यावेळेसच्या निवडणुकीत भाजपकडून जयकुमार रावल पुन्हा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे या जागेसाठी महायुतीमधील तीन पक्षात चुरस आहे.

Dhule Assembaly Election
Latur Assembly Election: दोन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या लातूरकरांच्या मनात चाललंय तरी काय?

साक्री विधानसभा मतदारसंघ :

या विधानसभा मतदारसंघात 2019 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि काँग्रेसचे धनाजी अहिरे यांच्यात मुख्य लढत झाली होती. या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांचा विजय झाला होता. मंजुळा गावित यांनी मोहन सूर्यवंशी यांचा 7 हजार 265 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला.

या वेळेसच्या निवडणुकीत मंजुळा गावित पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत व महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटणार यावरून चुरस आहे. जागा कोणाच्या वाट्याला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

Dhule Assembaly Election
Washim Assembly Election: वाशिम जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व; मविआ, महायुतीची धाकधूक वाढली

शिरपूर विधानसभा मतदारसंघ :

या विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपाचे काशीराम पावरा, काँग्रेसचे रणजीत पावरा आणि अपक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्यात लढत झाली होती. याठिकाणी भाजपाचे काशीराम पावरा यांचा विजय झाला होता. काशीराम वेचन पावरा यांनी 49 हजार 174 मतांनी पराभव करून जागा जिंकली.

या निवडणुकीत भाजपाचे काशीराम पावरा निवडणूक लढविण्यासाठी पुन्हा इच्छुक आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावर उमेदवार अवलंबून आहे.

Dhule Assembaly Election
Gadchiroli Vidhan Sabha Election : गडचिरोलीतील भाजपच्या बालेकिल्ल्यावर विधानसभेला वर्चस्व कोणाचे ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com