Solapur News : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान उद्या (मंगळवार) होत आहे. त्यासाठी निवडणूक प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघातील (Solapur Lok Sabha 2024) तीन लाख 19 हजार 808 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 1 हजार 966 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी लोकसभेच्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मोहोळ महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असल्याची खात्री केली आहे. कर्मचारी व अधिकारी यांना विविध सूचना दिल्या आहेत.
सर्वांनी मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, अशी सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली. 85 वयोगटाच्या पुढच्या व दिव्यांग अशा एकूण 196 मतदारांची मतदान प्रक्रिया पार पडली.
मोहोळ विधानसभा मतदार संघात सरकोली, कुरुल, कौठाळी, लमाण तांडा व राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ ही पाच आदर्श मतदान केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व बिनचूक पार पडावी या साठी नियुक्त केलेल्या 1 हजार 966 कर्मचाऱ्यांना मौखिक व यांत्रिक अशी दोन प्रशिक्षणे दिली आहेत. सोमवारी मतदान यंत्र घेऊन जाताना एक तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात एकूण 331 मतदान केंद्र आहेत.
मतदारांना थांबण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप उभारण्यात आला आहे.
एखाद्या मतदाराला कुठलीही शारीरिक बाधा होऊ नये यासाठी "मेडिकल किट" उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मतदारांच्या मदतीसाठी व सोयीसाठी 18 वर्षा खालील मुली व मुली स्वयंसेवक म्हणून नियुक्त केली आहेत.
त्यांना टी-शर्ट व टोप्या देण्यात आल्या आहेत. त्यावर मतदान केंद्रांचा क्रमांक असणार आहे.
मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी व मतपेट्या नेआण करण्यासाठी 19 बस गाड्या व 21 जीप ताब्यात घेतल्या आहेत.
एकूण मतदान केंद्र- 331
एकूण मतदार-3 लाख 19 हजार 808
एकूण प्रशिक्षण-3 एकूण कर्मचारी- 1966 आदर्श मतदान केंद्र-5
महाराष्ट्रात 11 लोकसभेची निवडणूक प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले याचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.