Video Sujata Saunik News : सुजाता सौनिक राज्याच्या नव्या मुख्य सचिव

Maharashtra Chief Secretary News: सुजाता सौनिक या सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्या 1987 च्या आयएएस अधिकारी आहेत. सेवा जेष्ठतेनुसार सौनिक यांचाच क्रमांक पहिला लागत होता.
Sujata Saunik
Sujata Saunik Sarkarnama

Mumbai News : राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ 30 जूनला संपणार आहे. त्यांच्या जागी आता राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची सेवा ज्येष्ठतेनुसार वर्णी लागली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरल्या आहेत.

सुजाता सौनिक (Sujata Saunik) या सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्या 1987 च्या आयएएस अधिकारी आहेत. सेवा जेष्ठतेनुसार सौनिक यांचाच क्रमांक पहिला लागत होता. सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत.

सुजाता सौनिक यांच्या नावाची घोषणा रविवारी करण्यात आली. रविवारी रात्रीच त्या मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांच्याकडुन मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. करीर यांचा कार्यकाळ 30 जूनला संपणार असल्याने त्यांच्या जागी सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इकबाल सिंह चहल या तीन नावांची चर्चा सुरु होती. सेवा जेष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांच्या नावाची चर्चा होती.

वरिष्ठ सनदी अधिकारी असलेल्या सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये झाले. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदाचा कारभार त्यांनी सांभाळला आहे. गेल्या तीन दशकांपासून त्या प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

Sujata Saunik
Supriya Sule News : आता त्यांना लाडकी बहीण, भाऊ सगळे आठवतील; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

सेवाज्येष्ठतेनुसार 1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांची वर्णी लागली आहे.

पती, पत्नी मुख्य सचिव होण्याची पहिलीच वेळ

राज्याच्या इतिहासात प्रथमच सुजाता सौनिक यांच्या रूपाने महिला अधिकाऱ्यास मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. सुजाता सौनिक या मुख्य सचिव झाल्याने पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sujata Saunik
Devendra Fadnavis News : राज्यातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण; फडणवीसांची पोस्ट चर्चेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com