Talathi Recruitment Scam: 15 लाख द्या अन् तलाठी व्हा! एका फोनमुळे फुटलं बोगस भरती रॅकेटचं बिंग

Chhatrapati Sambhajinagar Talathi Recruitment Scam: छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 लाख रुपये घेऊन तलाठी पदाची बनावट नियुक्तीपत्रे देणारे रॅकेट उघड झाले. बनावट शिक्के, खोट्या सह्या आणि बोगस प्रशिक्षणाद्वारे तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Chhatrapati Sambhajinagar Fake Talathi recruitment racket busted
Chhatrapati Sambhajinagar Fake Talathi recruitment racket bustedSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Talathi recruitment corruption: सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा कहर वाढत असतानाच आता थेट प्रशासनालाच गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तलाठी भरतीच्या नावाखाली बनावट नियुक्तीपत्रे, खोटे शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करून संपूर्ण भरती प्रक्रिया खरी असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. त्यामुळे महसूल विभागासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

काही व्यक्तींनी तरुणांना "15 लाख रुपये द्या आणि तलाठी व्हा" असे आमिष दाखवले. एवढेच नव्हे तर उमेदवारांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना लॅपटॉप देण्यात आले, तसेच कथित प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले. त्यामुळे ही भरती अधिकृत असल्याचा समज अनेक उमेदवारांचा झाला.

बनावट शिक्के, खोट्या सह्या अन् नियुक्तीपत्रांचा वापर

या रॅकेटने जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करत बनावट नियुक्तीपत्रे तयार केली. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या आणि बनावट शिक्के मारण्यात आले. त्यामुळे संबंधित कागदपत्रे प्रथमदर्शनी अधिकृत वाटत होती. यामुळे केवळ बेरोजगारांचीच नव्हे तर प्रशासनाची प्रतिमाही मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fake Talathi recruitment racket busted
Aided School Fee Reduction: अनुदान मिळूनही पूर्ण फी? शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; शाळांना फी कपातीचे आदेश

एका फोन कॉलमुळे उघड झाला प्रकार

या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश एका सजग तरुणामुळे झाला. नियुक्तीपत्राबाबत शंका आल्याने त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून चौकशी केली. त्यानंतर संबंधित नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि संपूर्ण रॅकेटचे बिंग फुटले.

Chhatrapati Sambhajinagar Fake Talathi recruitment racket busted
Pune News: जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून एनए करण्याचा प्रयत्न; तलाठ्याच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार उघड

प्रशासनाचे स्पष्टीकरण

2023 मधील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून 153 पैकी 144 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कोणतीही स्वतंत्र भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी आणि उमेदवारांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रशासनापुढे अनेक प्रश्न

या प्रकरणात अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी महसूल विभाग आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र बनावट नियुक्तीपत्रे तयार होईपर्यंत आणि प्रशिक्षणाचे नाटक रचले जाईपर्यंत प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य सरकारने भविष्यातील तलाठी भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबवण्याचा निर्णय घेतला असून सुमारे 1700 पदे भरण्याची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाला गंडा, बेरोजगारांना फटका

बोगस भरती रॅकेटचा हा प्रकार केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी यंत्रणेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com