Central Armed Police Force : जवानांच्या आत्महत्यांचा 'धक्कादायक' आकडा गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितला

Suicide causes in Indian paramilitary forces highlighted in Rajya Sabha: केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांनी आत्महत्यांच्या कारणांची माहिती दिली.
Central Armed Police Force
Central Armed Police ForceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाकडे भारताच्या सुरक्षितेची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. हे दल दहशतवाद आणि बंडखोरीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सीमा सुरक्षेबरोबरच संघटीत गुन्हेगारीला नियंत्रणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते.

परंतु गेल्या पाच वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) 700 हून अधिक जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करण्याचा हा आकडा धक्कादायक, असाच आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तराला ही माहिती दिली.

नित्यानंद राय यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) केंद्रीय जवानाच्या आत्महत्येचा गेल्या पाच वर्षांचा आकडा मांडला. 2020 मध्ये सीएपीएफमध्ये 144, 2021 मध्ये 157, 2022 मध्ये 138, 2023 मध्ये 157 आणि 2024 मध्ये 134 आत्महत्या झाल्याची प्रकरणे झाली. सीएपीएफमध्ये गेल्या पाच वर्षात एकूण 730 जवानांच्या आत्महत्या केल्या.

तसेच, गेल्या पाच वर्षांत 47 हजार 891 सीएपीएफ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि 7 हजार 664 जणांनी राजीनामा दिल्याचेही नित्यानंद राय यांनी सांगितले. या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण 55 हजार 555 जवानांनी राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

Central Armed Police Force
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द संघर्षशील; पण आलेख चढताच!

केंद्रीय सशस्त्र पोलिस (Police) दलाच्या विभागाकडून तसेच यंत्रणेकडून जवानांना कोणताही त्रास होत असल्याने आत्महत्या केल्याचे, असे एकही प्रकरणाची नोंद नाही. उलट जवानांना विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, यावर विभाग आणि यंत्रणेचा भर असतो, असे नित्यानंद राय यांनी सांगितले.

Central Armed Police Force
Marriage Scheme Scam : सरकारी योजनेतील पैशांसाठी लाडक्या बहिणीसोबत भावाचे लग्न; असा उघडकीस आला घोटाळा

जवानांसाठीच्या विविध सुविधांवर भर

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये (CAPF) साधारणपणे आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम केले जाते. या कामाबरोबर जवानांना आनंदी वातावरण मिळावे, यासाठी विविध सुविधा पुरवल्या जात असल्याचे नित्यानंद राय यांनी सांगितले.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गत मध्ये आसाम रायफल्स (AR), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांचा समावेश आहे. ह सर्व दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहेत.

एक लाख रिक्त पद भरण्याची कार्यवाही

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये एक लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9 लाख 48 हजार 204 होती. या दोन्ही दलात तब्बल 1 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी तशी माहिती दिली. यांनी बुधवारी राज्यसभेत सांगण्यात आले. ही रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी सरकारकडून कार्यवाही सुरू असल्याचेही नित्यानंद राय यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com