independence day

independence day

Sarkarnama 

मोदींचे आठव्यांदा लाल किल्ल्यांवरून भाषण! नेहरूंचा विक्रम मोडण्यासाठी हवीत आणखी नऊ वर्षे!!

नरेंद्र मोदी हेयेत्या १५ आॅगस्टला आठव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकविणार आहेत.
Published on

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरु होत आहे. स्वातंत्र्यदिनी Independence Day दरवर्षी १५ आँगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन Red Fort तिंरगा Tiranga फडकवला जातो. पण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनी मात्र, १५ आँगस्टला नव्हे तर १६ आँगस्टला लाल किल्ल्यावरुन तिंरगा फडकवला होता. त्यानंतर त्यांनी भाषण केलं होतं. स्वातंत्रदिनी ज्येष्ठ सनईवादक उस्ताद बिस्मिला खां यांना सनई वादनाचा मान मिळाला होता. पंडित नेहरुंना १५ ऑगस्टला तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला नसला तरी त्यांना त्यानंतर १७ वेळा लाल किल्ल्यावरुन तिंरगा फडकवण्याचा मान मिळाला.   

पंतप्रधानांच्या हस्ते तिंरगा फडकविण्याची प्रथा तेव्हापासून सुरू आहे. ५८ व्या वर्षी ते पंतप्रधान झाले त्यानंतर ते १७ वर्ष देशाचे पंतप्रधान होते. या विक्रम कुठल्याही पंतप्रधानाला अद्याप मोडता आलेला नाही. पंडित नेहरु यांच्यानंतर सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान त्यांनी कन्या इंदिरा गांधी  (24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 व 14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984 ) यांना मिळाला.

इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन १६ वेळा भाषण केलं. १९८४ ला इंदिरांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणानंतर त्यांचा दोन महिन्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकांनी हत्या केली. त्यानंतर सर्वात जास्त वेळा म्हणजे दहा वेळा मनमोहन सिंह यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला. अटलबिहारी वाजपेयींनी सहा वेळा पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं होतं. तर राजीव गांधी यांनी पाच वेळा तिरंगा फडकविला. 

त्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव यांना पाच वेळा तिरंगा फडकविण्याची संधी मिळाली. हंगामी पंतप्रधान राहिलेले गुलझारीलाल नंदा यांना एकदाही तिंरगा फडकविण्याची संधी मिळाली नाही. मोरारजी देसाई २ वेळा, चरणसिंग १ वेळा, व्ही. पी. सिंग १ वेळा, चंद्रशेखर १ वेळा, एच.डी. देवेगैाडा १ वेळा, इंद्रकुमार गुजराल  यांनी १ वेळा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकविला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आत्तापर्यंत ७ वेळा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकविला असून येत्या १५ आॅगस्ट रोजी मोदी हे आठव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवून देशाला संबोधित करणार आहे. यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्या स्वातंत्र्य दिनाला 72 मिनिटे भाषण केलं होतं. तर मोदींनी 2014 मध्ये 65 मिनिटे, 2015 मध्ये 86 मिनिटे, 2016 मध्ये 96 मिनिटे आणि 2017 मध्ये सर्वात कमी वेळेत म्हणजे 55 मिनिटांमध्ये भाषण संपवलं. तर 2018 मध्ये त्यांनी 82 मिनिटे भाषण केलं.  डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात 50 मिनिटांच्या आतच भाषण पूर्ण केलं. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 30 ते 35 मिनिटे देशाला संबोधलं होतं.

पंतप्रधान                                           कार्यकाल

पंडित जवाहरलाल नेहरू                       15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964
श्री. गुलझारीलाल नंदा (13 दिवस कार्यवाह)    27 मे 1964 ते 9 जून 1964
श्री. लालबहादूर शास्त्री                  9 जून 1964 ते 11 जाने. 1966
श्री. गुलझारीलाल नंदा (कार्यावह)             11 जाने. 1966 ते 24 मार्च 1966
श्रीमती इंदिरा गांधी           24 जाने. 1966 ते 24 मार्च 1977
श्री. मोरारजी देसाई           24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
श्री. चरणसिंग                       28 जुलै 1979 ते 14 जाने. 1980
इंदिरा गांधी                   14 जाने. 1980 ते 31 ऑक्टो. 1984
श्री. राजीव गांधी                  31 ऑक्टो. 1984 ते 2 डिसें. 1989
श्री. व्ही.पी. सिंग                   2 डिसेंबर 1989 ते 7 नोव्हे. 1990
श्री. चंद्रशेखर                   10 नोव्हे. 1990 ते 21 जून 1991
श्री. पी.व्ही. नरसिंहराव    21 जून 1991 ते 15 मे 1996
श्री. अटलबिहारी वाजपेयी    16 मे 1996 ते 28 मे 1996
श्री. एच.डी. देवेगौडा    1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
श्री. इंद्रकुमार गुजराल    21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
श्री. अटलबिहारी वाजपेयी    19 मार्च 1998 ते 22 मे 2004
श्री. मनमोहन गुरूमित सिंग    22 मे 2004 ते 26 मे 2014
श्री. नरेंद्र मोदी                   26 मे 2014 पासून कार्यरत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com