Political Leader Love Story
Political Leader Love StorySarkarnama

राजकीय नेत्यांची गाजलेली प्रेमप्रकरण...

नेत्यांचे प्रेमप्रकरणही समाजापासून लपून राहत नाही. बॅालिवुड, उद्योगविश्वाप्रमाणे राजकारणही आता वलांकित झालं आहे. राजकारणातील अशी अफेअर कधी चोरुन होत असतात तर कधी बिनधास्तपणे.

प्रेम सिनेमातील असो, गल्लीतील असो किंवा राजकारणातील. चर्चा तर होणारच. नेत्यांचे  प्रेमप्रकरणही समाजापासून लपून राहत नाही. बॅालिवुड, उद्योगविश्वाप्रमाणे राजकारणही आता वलांकित झालं आहे. राजकारणातील अशी अफेअर कधी चोरुन होत असतात तर कधी बिनधास्तपणे. प्रेमप्रकरणामुळे एखाद्या नेत्याला पदाला राजीनामा द्यावा लागतो, तर कधी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आयता विषय मिळतो. असं असले तरी प्रेमप्रकरणामुळे राजकारण मात्र ढवळून निघत. अशाच काही राजकीय नेत्यांनी ही प्रेमप्रकरणं..

सचिन पायलट- सारा अब्दुला
दोघांचे प्रतिष्ठित राजकीय घराणे, शिक्षणासाठी परदेशात गेले..अन् दोघांमध्ये प्रेमांचा अंकुर फुलला. अन् कुटुंबियांचा विरोध असतानाही ते विवाहबद्ध झाले. ही कहाणी आहे सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांची. सचिन हे काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे चिंरजीव, तर सारा या जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांची कन्या. या हिंदु- मुस्लिम विवाहात अनेक अडचणी निर्माण झाल्या. साराच्या भावाचा व वडिलांचा या लग्नाला विरोध होता.  त्यांना हिंदू जावई नको होता. या साऱ्या विरोधाला बाजूला सारुन दोघांनी साध्या पद्धतीने लगीनगाठ बांधली. सचिन पायलट नंतर राजकारणात सक्रीय झाले, तेव्हा अब्दुला कुंटुंबियांनी त्यांच्या लग्नाला मान्यता देऊन त्यांचा स्वीकार केला. 

शशी थरुर- सुनंदा थरुर 
राजकारणी व्यक्तींच्या प्रेमप्रकरणात सर्वात लक्षात राहते ती शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांची जोडी. सुनंदा पुष्कर यांना कोची संघाची फ्रंचायची मिळवून देण्यास नियमबाह्यपणे शशी थरुर यांनी मदत केली, या घटनेनंतर ही प्रेमकहाणी उजेडात आली. यामुळे शशी थरुर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सोशल मीडियावर ही प्रेमकहाणी खूपच चर्चेत राहिली. उद्योजिका सुनंदा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी यांच्या प्रेमाचे प्रदर्शन सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी नेहमी होत होते. काही कालावधीनंतर त्यांनी लग्न केलं. एकमेंकाना शोभणारे सेलिब्रेटी जोडपे म्हणून त्यांचा उल्लेख सोशल मीडियावर केला गेला. लग्नानंतर मात्र काही दिवसात दोघांमध्ये वाद निर्माण झाले. त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. दिल्लीतील एका हॅाटेलमध्ये सुनंदा पुष्कर या मृतावस्थेत आढळल्या. अन् या लव्हस्टोरीचा शेवट वाईट झाला. 

दिग्विजय सिंग - अमृता राय
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि पत्रकार व न्यूज अँकर अमृता राय यांचे प्रेमप्रकरण त्या काळी खूप गाजलं. अनेकांना धक्का बसला. दोघांमधील वयाचे अंतर जास्त असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. आठ- दहा वर्ष नव्हे तर पंचवीस वर्षाचा फरक या दोघांच्या वयात होता. दोघांचे एकत्रीत फोटो अचानकपणे समोर आल्याने ते प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलं. तेव्हा अमृता राय या विवाहित होत्या.  त्यांना आधीच्या नवऱ्यापासून घटस्फोट हवा होता. या प्रकरणावर दिग्विजय सिंग म्हणाले होते की प्रेम, लग्न या राजकारणी लोकांच्या खासगी गोष्टी असतात त्यावर जाहीर चर्चा करु नये. 

नारायण दत्त तिवारी- उज्ज्वला शर्मा
नारायण दत्त तिवारी यांचे नाव अनेक महिलांशी जोडले गेलं. त्यांच्या अशा वागणुकीमुळे ते उत्तराखंडमध्ये नेहमीच चर्चेत असायचे. १९६० मध्ये त्यांची ओळख उज्ज्वला शर्मा यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. उज्ज्वला या काँग्रेसचे नेते शेरसिंग यांच्या कन्या. त्यांना एक मुलगा झाला. पण नारायण दत्त तिवारी यांनी त्याला आपले नाव देण्यास नकार दिला. या मुलाने नारायण दत्त तिवारी हेच आपले वडील आहे. असा दावा केला. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टाने डी.एन.ए टेस्ट करण्याचा आदेश दिला. यात तो मुलगा हा नारायण दत्त तिवारी यांचा असल्याचे निष्षन्न झाले. पुढे या मुलाचा (रोहित शेखर) नारायण दत्त तिवारी यांनी स्वीकार केला.

एन टी रामा राव- लक्ष्मी पार्वती

प्रेमाला जात, धर्म, वयाचं अंतर नसते. याची प्रचिती आंध्रप्रदेशात आली. आंध्रप्रदेशाचे तीन वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एन.टी. आर  हे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांचे चरित्र लिहिणाऱ्या लक्ष्मी पार्वतीच्या प्रेमात पडले. हे प्रकरण खूपच गाजले. त्यामुळे आंध्रप्रदेशचे राजकारण ढवळून निघाले. एनटीआर यांचे जावई चंद्राबाबू नायडू हे या प्रकरणाच्या अगोदर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यावेळी या प्रेमप्रकरणामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले. पण या साऱ्याकडे दुर्लक्ष करुन एटीआर विवाहबंधनात अडकले. या विवाहाला मात्र एनटीआर यांच्या घरी मान्यता मिळाली नाही. त्यांच्या कुंटुबियांनी लक्ष्मी पार्वती यांचा स्वीकार केला नाही. लक्ष्मी पार्वती यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, निवडणुका लढविल्या, पण त्यात त्यांना यश आले नाही.

प्रशांत किशोर- जान्हवी दास

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तृणमूल कॅाग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या राजनीतीकार राहिलेले प्रशांत किशोर यांच्या राजकीय जीवनाबाबत आपल्याला माहित आहे. पण त्यांची  प्रेमकहाणी खूप कमी जणांना माहित आहे. प्रशांत किशोर हे मुळचे बिहारचे. त्याचे शालेय शिक्षण तेथेच झाले. पुढे  इंजिनिअरिंग केल्यानंतर प्रशांत किशोर हे युनाटेड नेशनच्या एका आरोग्य प्रकल्पावर काम करीत होते. त्या ठिकाणी त्यांची ओळख जान्हवी दास यांच्यासोबत झाली. जान्हवी या डॅाक्टर होत्या. त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर अगोदर मैत्रीत अन् नंतर प्रेमात झाले. त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांना एक मुलगा असून जान्हवी या अनेक अराजकीय कार्यक्रमात प्रशांत किशोर यांच्यासोबत दिसतात.   

इंदिरा गांधी- फिरोज गांधी

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची कन्या इंदिरा या इलाहाबाद येथे आपली आई कमला नेहरु यांच्यासोबत राहत होत्या. त्यावेळी त्यांच्या घरी फिरोज गांधी येत होते. फिरोज गांधी यांना इंदिरा खूप आवडल्या. फिरोज यांनी इंदिरा यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा इंदिरा यांचे वय सोळा वर्ष होते. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. इंदिरा या शिक्षणासाठी लंडनला गेला. फिरोजही लंडनला गेले. तेथे दोघंही एकमेंकांवर जीवापाड प्रेम करु लागले. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या लग्नाला जवाहरलाल नेहरु आणि कमला नेहरु यांचा विरोध होता. पण काही काळानंतर त्यांनी होकार दिला. पण लग्नानंतर इंदिरा आणि फिरोज यांच्यात मतभेद झाले. 

राजीव गांधी- सोनिया गांधी

इंदिरा गांधी यांचे चिंरजीव माजी पंतप्रधान राजीव गांधी हे केम्बिज युनिव्हसिर्टीमध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी शिकणाऱ्या इटालियन युवती सोनिया मायनो यांच्याशी त्यांची ओळख झाली. दोघेंही सुंदर, रुबाबदार असल्याने एकमेंकांच्या प्रेमात पडले. त्याची प्रेमकहाणी तीन-चार वर्ष रंगली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना लग्नाची परवानगी दिली. राजीव गांधी यांच्या दुदैवी मृत्यूनंतर सोनिया गांधी यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा होती. सोनिया गांधी त्यापासून अलिप्त राहिल्या. त्या काँग्रेसची धुरा सांभाळत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com