11th Class Admission News: अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तारीख जाहीर ; विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा..

11th Class Admission News : अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे.
 Eleventh Class Admission News
Eleventh Class Admission NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra College Admission News: दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. (11th class admission starting from 25th may 2023 education board declare)

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग येत्या २५ मे पासून भरण्यास उपलब्ध होणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील महानगर पालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यासाठी राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 Eleventh Class Admission News
Pune News: स्टॉलला लाथ मारणाऱ्या जगतापांवर कारवाई कधी ?; राजकीय पक्ष,पथारी संघटना आक्रमक

२०२३-२४ या वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक राज्याचे नवनियुक्त माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी येत्या २० ते २४ मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करू शकतात, असे देखील राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात.

 Eleventh Class Admission News
DK Shivakumar News : कर्नाटकाच्या CM पदावर दावा सांगणाऱ्या डी.के. शिवकुमारांबाबत मोठी बातमी ; सुप्रीम कोर्टानं..

अशी असेल अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया

  • प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबविली जाईल.

  • दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस राबवली जाईल.

  • विशेष प्रवेश फेरी १ सात ते आठ दिवस राबविण्यात येणार आहे.

  • उच्च माध्यमिक विद्यालयांना २० मे ते इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

  • इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उपलब्ध करून दिला जाईल.

  • अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com