राज्यातील १३ मंत्री, ७० आमदारांना कोरोना

राजकीय व्यक्तींच्या सभा, रॅली, लग्नसोहळे यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहेत.
corona

corona

sarkarnama

Published on
Updated on

पुणे : केंद्र सरकारने देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कोरोनात रुग्ण वेगानं वाढत आहे. राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याचा वेगाने प्रसार होत आहे. राजकीय नेते, मंत्री कोरोनाच्या विळख्यात (corona positive) सापडले आहेत. मंगळवारी (ता. ४) एकाच दिवशी ५ ते ६ नेत्यांना कोरोना झाल्याची माहिती आहे.

मंत्री, आमदार सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राजकीय व्यक्तींच्या सभा, रॅली, लग्नसोहळे यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी २० आमदार, १० मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता ही संख्या वाढत आहे. आता ७० आमदार, १३ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यात अधिक प्रमाणात नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळ चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर अनेक आमदारांना कोरोना झाल्याचे समोर आले. वर्षा गायकवाड यांच्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एकसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला. युवासेना नेते वरुण सरदेसाई हेही कोरोना पॅाझिटिव्ह आढळले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कोरोना बाधित आढळून आले आहेत. सध्या कर्जत नगर पंचायतच्या चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>corona</p></div>
ST strike : ५५ हजार जणांना कारणे दाखवा नोटीस

हे नेते कोरोनाच्या विळख्यात

हर्षवर्धन पाटिल – माजी मंत्री

एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री

पंकजा मुंडे – भाजप नेत्या

यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण मंत्री

के सी पाडवी – आदिवासी कल्याण मंत्री

सुप्रिया सुळे – खासदार

रोहित पवार- आमदार

राधाकृष्ण विखे पाटिल – आमदार

दीपक सावंत – माजी मंत्री

माधुरी मिसाळ – आमदार

वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण मंत्री

बाळासाहेब थोरात – महसूल मंत्री

प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री

चंद्रकांत पाटिल – आमदार

इंद्रनील नाईक – आमदार

समीर मेघे – भाजप आमदार

धीरज देशमुख – काँग्रेस आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com