बारामतीतही 'विशाल फटे' प्रकरण; शेअर मार्केटच्या नावाखाली १८ जणांना गंडा!

ट्रेड एडिशन कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर या सर्व गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट खात्याचे आयडी व पासवर्ड संजय भुसकुटे यांना दिले.
Share Market Scam News
Share Market Scam NewsSarkarnama

बारामती : शेअर मार्केटमध्ये (stock market) गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीत विशाल फटे याने हजारो गुंतवणूकदारांना शेकडो कोटींचा गंडा (fraud) घातला आहे. ही गोष्टी ताजी असतानाच बारामीतही (Baramati) असाच प्रकार घडला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत अधिक फायदा आहे, असे आमिष दाखवून बारामतीतील तब्बल १८ जणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. (56 lakh fraud in Baramati with the lure of investing money in stock market)

या फसवणूक प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी संजय भुसकुटे (रा. जय टॉवर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संजय मधुकर सातव (रा. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

Share Market Scam News
‘MSRDC खात्याचा राजीनामा देण्यासाठी मी फडणवीसांकडे गेलो होतो’

बारामती येथील संजय सातव यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची होती. त्याबाबतची माहिती मिळताच संजय भुसकुटे यांनी सातव यांची भेट घेत त्यांच्या ट्रेड एडिशन कंपनीबाबत माहिती दिली. तसेच, कंपनीत गुंतवणूक केल्यास ८० टक्के नफा होईल, असे आमिषही दाखविले. तोटा झाल्यास ट्रेड एडीशन फर्मचा संस्थापक या नात्याने जबाबदारी माझी असेल, असे सांगत विश्वास संपादन केला.

Share Market Scam News
‘बंडानंतरचे सुरुवातीचे तीन दिवस मी एक मिनिटसुद्धा झोपलो नव्हतो’

फिर्यादी संजय सातव यांनी सुरुवातीला पाच लाखाची गुंतवणूक केली. त्यांच्याशिवाय विजय भाऊसाहेब बनकर, सतीश बबन किर्दक, कैलास बाबुराव कदम, उत्तम नानासाहेब जगदाळे, जयवंत राजेंद्र सातव, प्रशांत राजेंद्र चव्हाण, अमोल रामकृष्ण खटावकर, राहूल रामकृष्ण खटावकर, रामदास अंबादास कापसे, सचिन माणिक शितोडे, बाबुराव विठ्ठल चव्हाण, संजय लक्ष्मण थोरात, अनिता अविनाश कदम, स्नेहल संजय सातव, सुजाता बाळासाहेब सुरासे, राजेश रमेश तांबडे, राजेश कलाप्पा कवाडे या सर्वांनी प्रत्येकी तीन लाख रुपयांप्रमाणे ५१ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

Share Market Scam News
एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट : माझ्या आणि फडणवीसांच्या संपर्कात अनेक आमदार...

ट्रेड एडिशन कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर या सर्व गुंतवणूकदारांनी शेअर मार्केट खात्याचे आयडी व पासवर्ड संजय भुसकुटे यांना दिले. ठरल्याप्रमाणे ७० टक्के नफा दिला नाही. तसेच गुंतवणूक केलेले पैसे परत न करता फसवणूक केली, असे सातव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com