‘बंडानंतरचे सुरुवातीचे तीन दिवस मी एक मिनिटसुद्धा झोपलो नव्हतो’

शपथविधीपर्यंत माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. कारण, लढाई सोपी नव्हती.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

ठाणे : शपथविधीपर्यंत माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. कारण, लढाई सोपी नव्हती. त्या काळातही माझ्या मूळ गावातील (सातारा जिल्हा Satara) लोकांनासुद्धा टेन्शन होतं. तर मला किती असेल, याचा विचार करा. कारण, माझ्यावर ५० आमदारांची जबाबदारी होती. बंडानंतरचे सुरुवातीचे तीन दिवस तर मी एक मिनिटसुद्धा झोपलं नव्हतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. (First three days after the Rebellion, I didn't sleep for a single minute : Eknath Shinde)

ठाणे येथे १७५ संस्थांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्याच कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान शिंदे यांनी बंडानंतरच्या काही गोष्टींचा उलगडला. त्यावेळी त्यांनी शपथविधीपर्यंत माझ्यावर तणाव होता, हे मान्य केले. ते म्हणाले की, शपथविधीपर्यंत माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. कारण, लढाई सोपी नव्हती. शपथविधीच्या अगोदरच्या काळात ज्या काही घडामोडी घडत होत्या. त्याही त्याला कारणीभूत आहेत. आमचा विशेष शब्दांनी उल्लेख केला जात होता. त्यामुळे तणाव होता.

Eknath Shinde
एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट : माझ्या आणि फडणवीसांच्या संपर्कात अनेक आमदार...

त्या काळातही माझ्या मूळ गावातील (सातारा जिल्हा) लोकही भातलागवडीसारखं महत्वाचं कामं असूनसुद्धा सर्व कामं बाजूला ठेवून दूरचित्रवाणी (टीव्ही) पाहत बसायचे. माझ्या गावातील लोकांनासुद्धा टेन्शन होतं. तर मला किती असेल, याचा विचार करा. कारण, माझ्यावर ५० आमदारांची जबाबदारी होती. आमचा प्रवास हा मुंबईतील विधानभवन ते ठाणे, ठाणे ते सूरत आणि सूरत ते गुवाहाटी असा होता. त्यामुळे त्या काळात माझ्यावर तणाव होता. मात्र सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या बोलण्यातून आमचा तणाव हलका करण्याचा प्रयत्न करायचे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? मोदी-शहांनी एकनाथ शिंदेंना दिले हे उत्तर...

उद्धव ठाकरेंना टोला

मला मुख्यमंत्रीपद हे परिस्थितीमुळे मिळाले आहे. या निर्णयामुळे भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो, हे मोडीत निघाले आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविणार असे पूर्वी काही लोक म्हणायचे. दुर्दैवाने ते झाले नाही. पण भारतीय जनता पक्षाने ते केले. त्यांना आम्ही यापूर्वीच मनापासून धन्यवाद दिले आहेत, असे सांगून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com