६९ वर्षांच्या सखूबाई बनल्या चास गावच्या सरपंच!

सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होत्या त्यामध्ये सखूबाई मुळूक व आशा मुळूक यांच्यात मुख्य लढत रंगली.
६९ वर्षांच्या सखूबाई बनल्या चास गावच्या सरपंच!

चास : चास ( ता. खेड ) ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात झाली. सरपंचपदी चास गावच्या राजकारणात प्रथमच 69 वर्षांच्या सखुबाई बबन मुळूक या विराजमान झाल्या असून सदस्यपदासाठीही मोठी चुरस दिसून आली. विशेष बाब म्हणजे निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे पॅनेल नसताना सर्व विजयी उमेदवारांनी संयुक्तपणे ढोल ताशांच्या गजरात मीरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला.

ग्रामपंचायतीचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार व सरपंच पद महिलेसाठी खुले असल्याने साहजीकच निवडणूकीत चुरस दिसून आली. सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होत्या त्यामध्ये सखूबाई मुळूक व आशा मुळूक यांच्यात मुख्य लढत रंगली. सखुबाई मुळूक यांना 480 मते मीळाली तर आशा मुळूक यांना 424 मते मिळाली. त्यामुळे अखेरच्या टप्यात सखुबाई 56 मतांच्या आघाडीने निवडून आल्या. सखूबाई या गृहिणी असून, त्यांना तीन मुले आहेत. त्या तिसरी पास आहेत. 

वार्ड क्र. 1 मधून तीनही उमेदवार या आधीच बिंनविरोध निवडले होते त्यामध्ये रेश्मा संदिप रासकर, परविन समीर तांबोळी व भिमराव बाजीराव गायकवाड. वार्ड क्र. दोन मधून विनायक भाऊसाहेब मुळूक ( 329 मते ), शारदा बाबाजी टोके ( 308 मते ), व सुषमा बाळशिराम कदम ( 376 मते ). वार्ड क्रमांक तीन मधून विमल विलास चासकर यांची निवड बिनविरोध झाली होती तर उर्वरीत नवनाथ दत्तात्रय वाळुंज ( 303 मते ) व संदिप भगवान ढमढेरे ( 270 मते ) हे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांची संयुक्त मिरवणूक चास गावातून फटाक्यांच्या आतीषबाजीसह भंडार व गुलालाची उधळण करत ढोल ताश्यांच्या गजरात काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. आर. उगले यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com