बारामती : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमने सामने आलेल्या बारामती (Baramati) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९७. ३७ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी शनिवारी (ता. २९ एप्रिल) बारामतीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे होणार आहे. सर्व निकाल उद्या दुपारी एकपर्यंत हाती येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली. (97 percent turnout in Baramati Agricultural Produce Market Committee elections)
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. एक जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनेलचे १७, तर भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचे १६ उमेदवार रिंगणात होते. एक अपक्ष उमेदवारही आपले नशीब अजमावत आहे. दरम्यान, बाजार समितीच्या २६२८ मतदारांपैकी २५५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
कृषी पतसंस्था इतर मागासवर्ग मतदार संघातून राष्ट्रवादीचे नीलेश भगवान लडकत हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजप सर्व पक्षांना एकत्र करत शेतकरी विकास पॅनेल निवडणुकीत उतरवला आहे. त्या पॅनेलच्या माध्यमातून १६ उमेदवार रिंगणात उतरवून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बारामती तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर आज सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अधिकाधिक मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसले. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी ९७. ३७ टक्क्यांपर्यंत गेली आहे. सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपने इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन पॅनेल दिल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.