PCMC News : मविआ’ने डावलले पण भाजपकडून ‘डीपीडीसी’वर पिंपरी-चिंचवडला संधी

महाविकास आघाडीने पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना संधी देताना हात आखडता घेतला होता,
kaluram nadhe | Vijay Phuge
kaluram nadhe | Vijay Phuge
Published on
Updated on

PCMC News : पुणे जिल्ह्याच्या विकासाचा मसूदा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसी) भाजपने (BJP) पिंपरी-चिंचवडमधील दोन सदस्य नेमून शहराला प्रतिनिधीत्व दिले आहे. यापूर्वीच्या पुणे ‘डीपीडीसी’त महाविकास आघाडी सरकारने उद्योगनगरीला ठेंगा दाखवला होता.

महाराष्ट्र अधिनियम १९९८ क्रमांक २४ नुसार, राज्यातील जिल्ह्यांमध्ये पंचायत समिती, नगरपालिका यांनी तयार केलेल्या योजना एकत्रित करण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी विकास योजनांचा मसूदा तयार करण्यासाठी जिल्हापातळीवर नियोजन समितीची रचना करण्याची तरतूद आहे. त्यानुसार राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या माध्यमातून विधीमंडळ सदस्यांमधून आमदार भिमराव तापकीर, आमदार राहुल कुल, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश बिडकर, माजी मंत्री विजय शिवतरे, तसेच जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, राहुल पाचर्णे इ. लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातून विजय फुगे, काळूराम नढे यांना संधी दिली आहे.

kaluram nadhe | Vijay Phuge
Bhide Wada News : भिडे वाड्याच्या मूळ मालकांशी चंद्रकांत पाटलांनी केली चर्चा; लवकरच काम सुरु होणार

याउलट, २० जानेवारी २०२१ रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तल्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार अमोल कोल्हे, आमदार संजय जगताप, यांच्यासह २९ जणांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यात पिंपरी-चिंचवडमधील एकालाही संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता तर हवी, पण निर्णय प्रक्रियेत स्थान द्यायचे नाही, असे महाविकास आघाडी सरकारचे होते,का अशी विचारणा शहरातून आता होऊ लागली आहे.

भाजपाकडून पिंपरी-चिंचवडला झुकते माप..

२०१४ मध्ये राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यसभा सदस्यपदी अमर साबळे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशीव खाडे, राज्य लोकलेखा समितीवर ॲड. सचिन पटवर्धन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळावर अमित गोरखे, माथाडी महामंडळावर अनुप मोरे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर विधान उमा खापरे यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. त्यामुळे भाजपने सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडला संधी दिल्याचे दिसून येते.

त्याचवेळी राज्यात अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना संधी देताना हात आखडता घेतला होता,अशी खंत आता या नियुक्तीवर शहरातून व त्यातही राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.हा धागा पकडत राष्ट्रवादीने स्थानिक नेतृत्वाला कधीच मोठे होवू दिले नाही, क्षमता असतानाही अनेकांना डावलण्यात आले,असा आरोप भाजपचे पिंपरी-चिंचवडकर प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक मंडळी भाजपत प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहेत,असा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com