Pune Accident: गाढ झोपेतच नियतीनं डाव साधला...; कात्रज बोगद्याजवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात,४ प्रवाशांचा मृत्यू

Pune Bengaluru Expressway Accident : प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला.
Pune Accident
Pune AccidentSarkarnama

Pune : पुणे-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात मध्यरात्री दोन वाजता घडला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात(Accident) झाला. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चार जणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.

जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु

पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघातात एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. तर जखमी अवस्थेत असलेल्या एकूण २२ जणांना पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलीस काय म्हणाले?

सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी या अपघाताबाबत माहिती देताना म्हणाले, कोल्हापूरहून डोंबिवलीला जात असताना खासगी ट्रॅव्हल बस होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात होता. मात्र, भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात 4 जणांचा 22 प्रवाशी जखमी झाले. जखमींवर ससून आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही घावटे यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com